You are currently viewing माजगाव येथिल श्री महादेव मंदिरात सोमवारी दि.8 ऑगस्ट रोजी हरीनाम सप्ताहाचे आयोजन

माजगाव येथिल श्री महादेव मंदिरात सोमवारी दि.8 ऑगस्ट रोजी हरीनाम सप्ताहाचे आयोजन

माजगाव

माजगाव वृत्तसेवा- माजगाव येथिल श्री महादेव मंदिरात सोमवारी दि.8 ऑगस्ट रोजी हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे
माजगाव गावात सालाबादप्रमाणे श्रावण महिन्यात हरीनाम सप्ताहचे आयोजन केले जाते त्या दिवशी श्री महादेव मंदिरात शिवलिंगवर एकादशमी,अभिषेक,लघुरुद्र व गावातील वाड्यावार भजनी मंडळाची सेवा सादर करतात.सोमवारी सायंकाळी 5 वाजता माजगाव दतमंदिर ते महादेव मंदिरा पर्यत माजगाव हायस्कुलच्या विद्यार्थीची दीडी काढली जाणार आहे. तर मंगळवारी सकाळी महादेव मंदिर ते सातेरी मंदिरा पर्यत ग्रामस्थाच्या दीडीने हरीनाम सप्ताहची समाप्ती होणार आहे. भाविकांनी सप्ताह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत सचिव विजय माधव व मानकरी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + 6 =