You are currently viewing कथाकथन स्पर्धेत कळसुलकरचा चिन्मय कोटणीस प्रथम

कथाकथन स्पर्धेत कळसुलकरचा चिन्मय कोटणीस प्रथम

सावंतवाडी

जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत येथील कळसुलकर इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी चिन्मय कोटणीस याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा विद्या विहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ओरोस या ठिकाणी कै. विद्याधर शिरसाट यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात झाली. या स्पर्धेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.
चिन्मय कोटणीस हा प्रथम आला. त्याला रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एम.पी.मानकर, एस.एस.चव्हाण, जे.एस पावसकर, ए.जे.ठाकर, एस.पी.कुलकर्णी, एस.जी.सामंत, एस.व्हीं.भुरे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा