अभियंता भवन अमरावती येथे रविवारी ७ ऑगस्ट रोजी आयोजन.
अमरावती:- अमरावती जिल्ह्यातील माहुली जहागीर या गावातील श्री राजेश खवले हे सध्या गोंदिया येथे अपर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एक अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा एवढा मोठा उच्च पदस्थ अधिकारी झाला हे खरोखरच आमच्या अमरावतीकरांना अभिमानाची बाब आहे. कुणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही. पण ती वस्तुस्थिती आहे आणि खवले साहेब आज जरी ते अपर जिल्हाधिकारी असले तरी उदरनिर्वाहासाठी त्यांना कापडाच्या दुकानात काम करावे लागले आहे. माहुली जहागीर सारख्या गावात राहून रोज अमरावतीला अपडाऊन करून आणि कापडाच्या दुकानात काम करून त्यांनी अपर जिल्हाधिकारी हा पल्ला गाठलेला आहे. नुसतं ते अपर जिल्हाधिकारी होऊन थांबले नाहीत तर येणाऱ्या पिढीला स्पर्धा परीक्षेची माहिती व्हावी त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी ते सतत धडपडत आहेत आणि राहणार आहेत. आम्ही त्यांची दोन पुस्तके प्रकाशित केलेली आहे. त्या पुस्तकांची नावे आहेत प्रेरणा स्पर्धा परीक्षेची आणि आनंदी राहा यशस्वी व्हा. श्री राजेश खवले साहेबांची यशोगाथा आगळीवेगळी आहे. खरं म्हणजे माऊली जाहागीर गावात खवले साहेब जेव्हा कपड्याच्या दुकानात काम करीत होते तेव्हा त्यांनी त्यांचे डोके लढविले. सकाळी कॉलेज. दुपारी दुकान. आणि ते रात्रीपर्यंत चालणार. मग अभ्यास करायला वेळ कसा मिळणार ? पण त्यातून त्यांनी मार्ग काढला आणि त्यासाठी त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या आपल्या आवाजामध्ये कॅसेट तयार केल्या .साहेब जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाले .तेव्हा संगणक लॅपटॉप मोबाईल सिडी हा प्रकार नव्हता. तेव्हा होत्या त्या कॅसेट. साहेबांनी पूर्ण अभ्यास कॅसेटमध्ये टेप केला आणि कापडाच्या दुकानात काम करीत असताना जेव्हा गिऱ्हाईक नसेल तेव्हा ते आपला टेप रेकॉर्डर ऑन करायचे आणि आपला अभ्यास करायचे. पण त्यांनी जो अभ्यास केला तो प्रामाणिकपणे केला. मनापासून केला. आपण ग्रामीण भागातले आहोत .आपण उंच भरारी घेतली पाहिजे .ही जिद्द ही महत्त्वाकांक्षा डोळ्यासमोर ठेवली आणि ती पूर्ण करून दाखविली. खरं म्हणजे तेव्हाची परिस्थिती स्पर्धा परीक्षेला अनुकूल अशी नव्हती. पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा खवलेसाहेबांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा प्रोत्साहन देणारे कोणी नव्हतं .आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. शिवाय माहुली जहागीर ते अमरावती हे 25 किलोमीटरचे अंतर पार करावे लागत होतं. 25 किलोमीटर जाणे आणि 25 किलोमीटर येणे. पण ते झुंजत राहिले .येणाऱ्या परिस्थितीवर मात करीत राहिले. आणि यशस्वी झाले. खवलेसाहेबांनी एका नवीन लिपीचा शोध लावलेला आहे .खरं म्हणजे त्यासाठी त्यांना पीएचडी द्यायला हरकत नाही .आपला अभ्यास करताना तो लक्षात कसा ठेवावा यासाठी त्यांनी ब्राह्मी लिपी विकसित केली आहे .या लिपीचा अभ्यास केला तर तुम्हाला पूर्ण अभ्यास लक्षात ठेवता येतो .आणि धाग्याचा प्रारंभ बिंदू जर तुम्हाला सापडला तर ज्याप्रमाणे पूर्ण धाग्याच्या बंडल तुम्हाला उकलता येते. त्याप्रमाणे ही ब्राह्मी लिपी आहे .सर ठिक ठिकाणी व्याख्यानाला जातात .आज साहेब उपजिल्हाधिकारी असले तरी त्यांच्या वागण्यांमध्ये अतिशय विनयशीलता आहे .येणाऱ्या प्रत्येकाला वेळ देण्याची त्यांची प्रवृत्ती आहे. त्यांची माझी पहिली भेट अमरावतीचे तेव्हाचे महसूल उपायुक्त श्री गोविंदराव कुबडे यांच्याकडे झाली. साहेब वाशिमला असताना साहेबांनी वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षा कार्यशाळांची आखणी केली .त्यासाठी मला बोलावले. आणि वाशिम जिल्ह्यातील तरुणांना स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख करून दिली.सतत वाचन करणारा सतत मनन करणारा व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नेहमी तत्पर असणारा अधिकारी म्हणून श्री राजेश खवले यांचा नावलौकिक आहे .साधी राणी आणि उच्च विचारसरणी हा त्यांचा आदर्श आहे. मी जेव्हा वाशीमला होतो आणि कार्यक्रम घेत होतो तेव्हा साहेबांची मी तळमळ पहिली. कुठलाही बडेजाव नाही .साहेबांकडे तेव्हा साधी वँगनार गाडी होती.येणाऱ्या प्रत्येकाला भेटणे .त्याला मार्गदर्शन करणे आणि समर्पित भावनेने मी त्याला काय मदत करू शकतो .या भावनेने साहेब काम करीत आहेत. आणि म्हणूनच आज विदर्भामध्ये चांगले अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे .आपल्याबरोबरच आपल्या परिचयाच्या सामाजिक बांधिलकीच्या अधिकाऱ्यांना आपल्याबरोबर घेऊन गोरगरिबांच्या मदतीला धावणारा हा खऱ्या अर्थाने देवदूतच आहे असे म्हणावे लागेल .खऱ्या अर्थाने श्री राजेश खवले यांनी प्रशासन हे सर्वसामान्य लोकांपर्यंत गरिबांपर्यंत पोहोचण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि करीत आहेत.गोंदियाला रुजू झाले तेव्हा त्यांनी अनेकांना मदतीचा हात दिला .त्यासाठी त्यांनी आपले सहकारी अधिकारी व मित्रमंडळी यांची मदत घेतली. प्रसंगी ते गरिबाच्या अनाथाच्या झोपडीतही गेले. एक अपर जिल्हाधिकारी वर्गाचा माणूस गरिबाच्या झोपडीपर्यंत जातो .तेव्हा खऱ्या अर्थाने प्रशासन लोकाभिमुख झालेले असते .सर्वांनाच ही किमया जमते असं नाही .अकरा ते पाच या वेळापत्रकात काम करणारे अनेक कर्मचारी आहेत .पण खवले साहेबांच्या वेळापत्रकात 24 तास हे लोकांसाठी होते आहेत व राहतील. खवले साहेबांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते सतत चळवळीत राहिलेले आहेत. आपले लेखनाचे अंग त्यांनी विकसित केलेले आहे .त्यांनी केलेला क्रांतीरत्न हा ग्रंथ मराठी साहित्याच्या दरबारात मैदानाचा दगड ठरला आहे. 1000 पृष्ठांचा महात्मा फुले ग्रंथ तशी फारशी सोपी गोष्ट नाही .पण खवले साहेबांनी तन-मन धनाने या प्रकल्पाला वाहून घेतले आणि क्रांतीरत्न आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले .अशा या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाच्या विनम्र व्यक्तिमत्वाला आमच्या हार्दिक शुभेच्छा .प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ. पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती 9 8 9 0 967003