You are currently viewing बुलंद पटेल यांनी घेतली नारायण राणेंची सदिच्छा भेट..!

बुलंद पटेल यांनी घेतली नारायण राणेंची सदिच्छा भेट..!

कणकवली :

भाजपा शहर मंडल अल्पसंख्यांक मोर्चा तालुकाध्यक्ष बुलंद पटेल यांनी खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट घेतली. कणकवली पं. स. चे माजी उपसभापती बुलंद पटेल यांची नुकतीच भाजपा शहर मंडल कणकवली अल्पसंख्याक मोर्चा तालुकाध्यक्षपदी निवड झाली. या निवडीनंतर प्रथमच पटेल यांनी खासदार राणे यांची भेट घेतली. खासदार राणे यांच्या भेटीत पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडून अपेक्षित काम करण्याची ग्वाही दिली. नियुक्तीबद्दल खासदार राणे यांनी बुलंद पटेल यांचे अभिनंदन केले. यावेळी शहर मंडल तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर, राजू पेडणेकर, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष सुभाष मालंडकर, अमर गावकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा