You are currently viewing वैभववाडी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वैभववाडी युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

वैभववाडी:

मा. उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांच्या नेतृत्वाखाली वैभववाडी जी. प शाळेत खाऊ वाटप, ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांच्या सूचनेनुसार वैभववाडी येथे आज आणि उद्या विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

यावेळी वैभववाडी तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्यकारणी बैठक ही संपन्न झाली. यावेळी वैभववाडी तालुका युवक अध्यक्ष वैभव रावराणे, संजय गांधी निराधार समिती सदस्य संकेत सावंत, माजी सैनिक भाई रावराणे, प्रवीण पवार, अक्षय पंडित, सौ.पाटील मॅडम, अर्चना कोरगावकर, अनंत पवार, मोहन लसने आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा