You are currently viewing कांदळगाव खाजनपात्रात बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला सडलेल्या स्थितीत  

कांदळगाव खाजनपात्रात बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला सडलेल्या स्थितीत  

मालवण

कांदळगाव शेमाडवाडी येथील मारुती मोहन मांजरेकर (वय ३८) या तरुणाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत शनिवारी कांदळगाव खानजपात्रात सापडून आला. मारुती हा ५ जून पासून बेपत्ता होता.

दरम्यान मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सडलेल्या स्थितीतील मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून वैद्यकीय तपासणी व पुढील तपास सुरू असल्याची माहिती मालवण पोलिसांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा