You are currently viewing तळवडेचे सुपुत्र नित्यानंद सावंत यांची सुभेदार मेजर पदावर नियुक्ती

तळवडेचे सुपुत्र नित्यानंद सावंत यांची सुभेदार मेजर पदावर नियुक्ती

सावंतवाडी

सावंतवाडी तालुक्यातील तळवडे खेरवाडी गावचे सुपुत्र नित्यानंद गुणाजी सावंत यांची नुकतीच सैन्यदलात सुभेदार मेजर या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे एकूण एक हजार सैनिकांमध्ये अकरा जणांची सुभेदार मेजर म्हणून निवड करण्यात आली त्यात नित्यानंद सावंत हे पहिल्या स्थानी होते.

नित्यानंद सावंत यांची सैन्यात तीस वर्षांपूर्वी पुणे भागातून भरती झाली होती सध्या ते पुणे वानवडी येथील युनिटमध्ये कार्यरत आहेत या युनिट चे कमांडिंग ऑफिसर यांच्या हस्ते त्यांचा सुभेदार मेजर पदाचा दिक्षांत सोहळा नुकताच पार पडला पुढील महिन्यात सावंत पंजाब अमृतसर येथे आपल्या मूळ पदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

नित्यानंद सावंत यांचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण शारदा विद्यामंदिर तळवडे नंबर ४ येथे तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण श्री जनता विद्यालय तळवडे येथे झाले नित्यानंद यांच्या मनात लहानपणापासूनच सैनिक होण्याची इच्छा होती पण जिल्हा सैनिक प्रशिक्षणाची त्यावेळी सोय नव्हती घरात देखील सैन्यात कोणीच नव्हते म्हणून पुण्यातील मोठ्या भावाकडे आसरा घेऊन तेथे पुढील शिक्षण व सैन्यातील सराव करून वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी पुणे येथे ए आर ओ ऑफिस मधून सैन्यात प्रवेश मिळवला याकामी पुण्यातील श्री गवस यांचे प्रशिक्षण फारच मोलाचे ठरले.

प्रतिक्रिया व्यक्त करा