You are currently viewing खा. विनायक राऊत वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

खा. विनायक राऊत वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा

*अनंत पिळणकर यांनी दिल्या शुभेच्छा*

 

ओरोस :

 

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकनेते खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा ओरोस येथे कराळे सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी खासदार विनायक राऊत यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

त्यांच्या सोबत चंद्रशेखर रावराणे, निलेश रावराणे, विशाल रावराणे, रमेश रावराणे, देवेंद्र पिळणकर उपस्थित होते. खासदार विनायक राऊत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =