You are currently viewing वेंगुर्ले येथे मच्छिमारांना नौदलाकडून सागरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन….

वेंगुर्ले येथे मच्छिमारांना नौदलाकडून सागरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन….

वेंगुर्ले

भारतीय तटरक्षक दल, भारतीय नौदल, सिंधुदुर्ग पोलिस व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले पोलिस ठाणे हद्दीत आज सकाळी सातेरी मंगल कार्यालय अणसूर रोड येथे सामुदायिक संपर्क कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित मच्छिमारांना नौदलाकडून सागरी सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय कुमार, तटरक्षक दलाचे राजेंद्र बनकर, एमएमबी अधिकारी संदिप भुजबळ, वेंगुर्ले पोलिस निरीक्षक अतुल जाधव, मत्स्यविभाग वेंगुर्ले परवाना अधिकारी चिन्मय जोशी, संजय गावडे, पोलिस स्टाफ, वेंगुर्ले, शिरोडा व मूठ मच्छिमार सोसायटीचे प्रतिनिधी, स्थानिक मच्छीमार तसेच सागरी सुरक्षा रक्षक, वार्डन, स्थानिक ग्रामस्थ आदी उपस्थित होते. उपस्थितांना नौदलाकडून सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले व समस्या जाणून घेऊन चर्चा करण्यात आली. यावेळी मच्छिमारांना सागरी सुरक्षेबाबत घ्यावयाची दक्षता, नौकांवर वापरण्यात येणारी यंत्रणा, खराब हवामान असल्यास घ्यावयाची काळजी, नौकांवर आवश्यक असणारी कागदपत्रे, समुद्रात संशयास्पद काही घटना आढळल्यास घ्यावयाची खबरदारी आदी विषयांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 4 =