You are currently viewing सावंतवाडी शहरात पालिकेकडून “हर घर तिरंगा” अभियानाची जनजागृती…

सावंतवाडी शहरात पालिकेकडून “हर घर तिरंगा” अभियानाची जनजागृती…

सावंतवाडी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सुरू असलेल्या “हर घर तिरंगा” अभियानाची जनजागृती करण्यासाठी येथील पालिका प्रशासनाच्या वतीने शहरात प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी भारत माता की जय…! वंदे मातरम…! हर घर तिरंगा…! अशा घोषणा देत प्रत्येक घरात तिरंगा फडकविण्याचा संदेश देण्यात आला. या रॅलीत मोठ्या संख्येने पालिका कर्मचारी व महिला सहभागी झाल्या होत्या.

यावेळी पालिकेच्या प्रशासकीय अधिकारी आसावरी शिरोडकर, दीपक म्हापसेकर, परवीन शेख, श्री. बांदेकर, रसिका नाडकर्णी आदींसह पालिका पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा