You are currently viewing राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी वैष्णवी भांगले हीची निवड…

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी वैष्णवी भांगले हीची निवड…

बांदा

नुकत्याच अहमदाबाद गुजरात येथे घेण्यात आलेल्या ८ व्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिपसाठी सिंधुदुर्ग च्या २ नेमबाजांची निवड झाली होती. त्यांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली.

दोन्ही स्पर्धक १० मीटर पीप साईट प्रकारात सहभागी झाले. यात कु. शार्दुल सुधीर शिरसाट याने ४०० पैकी ३५३ गुण मिळविले तर कू. वैष्णवी गोविंद भांगले हिने ४०० पैकी ३७६ गुणांची नोंद केली. वैष्णवीने मिळवलेल्या गुणांच्या जोरावर तिची निवड राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात झाली. हे दोन्ही खेळाडू बांदा येथील उपरकर शूटिंग रेंज वर सराव करतात. त्यांना प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे प्रशिक्षण मिळाले तसेच आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विक्रम भांगले यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेतील सहभाग तसेच यशाबद्दल या स्पर्धकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा