You are currently viewing ईडीवाले बाबा

ईडीवाले बाबा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी निवृत्त पोलिस अधिकारी वासुदेव खोपडे लिखीत अप्रतिम काव्यरचना

ईडी पीडा धन तिढा
गिळून मिळवा ताबा
आमच्या गावात आले
मोठे ईडीवाले बाबा !!

गौरवर्णी,ब्रम्हचारी
बाबा शुभ्र जटाधारी
मितभाषी दुःखहारी
बाबा दिव्य दृष्टी धारी !!

मंत्र नाही तंत्र नाही
नाही निंबू धागा दोरा
हात ठेवता हो शिरी
काळा प्राणी होई गोरा !!

भक्षिले जरी अभक्ष
शोषियले जन रक्त
जाता बाबांशी शरण
व्हाल सर्व व्याधी मुक्त !!

नेता व्यापारी अधिकारी
असो कितीही तो भ्रष्ट
पट्ट शिष्य जो अमुचा
तिन्ही जगी तोची श्रेष्ठ !!

नको भेदभाव ऐसा
बाबा एकच काम करा
सारे शेठ,नेता,अधिकारी
यांची ईडी पूजा करा !!

गल्लीतला नेता कैसा
आज करोडपती झाला
धान, फळं, भाजीवाला
शोधा शेठ कसा झाला ?

छोटा मोठा अधिकारी
कशी जमवतो माया
शेतीत घाम गाळता
माही जिंदगी गेली वाया !!

शोधून,खोदून काढा
सारेच भ्रष्ट असुर
समूळ उपटून फेका
हा भ्रष्टाचारी नासुर !!
बाबा,भ्रष्टाचारी नासुर !!

वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेवानिवृत्त)
अकोला 9923488556

प्रतिक्रिया व्यक्त करा