You are currently viewing शिंदे, केसरकर यांचे कपडे पांढरे असले तरी चारित्र्य डागाळलेले – गौरीशंकर खोत

शिंदे, केसरकर यांचे कपडे पांढरे असले तरी चारित्र्य डागाळलेले – गौरीशंकर खोत

एकतर पोलीस कष्टडी अन्यथा भाजप प्रवेश हे दोनच मार्ग विरोधकांसमोर – आ. वैभव नाईक

*आ.वैभव नाईकांसह शिवसेना नेत्यांची कणकवली मतदारसंघात एंट्री*

*कासार्डे, खारेपाटण,नांदगाव जि. प. मतदारसंघात घेतल्या बैठका*

एकनाथ शिंदे, दीपक केसरकर यांचे कपडे पांढरे असले तरी त्यांचे चारित्र्य डागाळलेले आहे. कोकणात गद्दारीचे पीक कधीच उगवत नाही गद्दारांना येथील जनता धडा शिकवेल. शिवसेनेने या सर्वांना सर्वकाही दिले परंतु असे असतानाही गद्दारी केली. पक्षप्रमुख आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही. येत्या काळात शिवसेनेची कणकवली मतदारसंघाची ताकद दाखवून देऊ असा इशारा शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत यांनी दिला आहे.


शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक,जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कणकवली तालुक्यातील कासार्डे, खारेपाटण,नांदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात बैठका पार पडल्या.

*यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,* देशातील मूळ प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी नवनवीन क्लुप्त्या भाजपच्या माध्यमातून लढविल्या जात आहेत. भाजप विरोधात जो बोलेल त्याला दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकतर पोलीस कष्टडी अन्यथा भाजप प्रवेश हे दोनच मार्ग विरोधकांसमोर आहेत.नारायण राणेंना देशाचे मंत्री पद मिळाल्यापासून त्यांनी किती विकास निधी जिल्ह्यासाठी आणला. त्यांच्या खात्याचा किती उद्योजकांना लाभ झाला हा संशोधनाचा विषय आहे. केवळ आणि केवळ शिवसेनेवर टीका करण्यासाठी नारायण राणेंना मंत्री पद देण्यात आले. मात्र आता त्यांचा उपयोग संपला आहे. उद्धवजी ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत सिंधुदुर्ग वासियांचे स्वप्न असलेले शासकीय मेडिकल कॉलेज, महिला बाल रुग्णालय असे महत्वाचे विषय मार्गी लावले.त्याचबरोबर सिंधुदुर्गातील अनेक विकास कामे त्यांनी मार्गी लावली असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी शिवसेना संघटना वाढीसाठी एकजुटीने काम करून येत्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले.
यावेळी खारेपाटण येथे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, कणकवली तालुकाप्रमुख शैलेश भोगले, अँड हर्षद गावडे, महेश कोळसुळकर, प्रकाश नर, सुनील कुलकर्णी, संतोष गाठे, रामचंद्र राऊत, संजय कापसे, सुनील कर्ले, दयानंद कुडतरकर, गिरीश पाटणकर, दीपक बोभाटे संतोष तुरळकर, प्रकाश नादिवडेकर, वैभव कांबळे, आनंद वळंजू, भूषण कोळसूलकर,
कासार्डे येथे विभागप्रमुख बबन मुणगेकर, गुरुप्रसाद कल्याणकर, महादेव सकपाळ, यतीन म्हस्के, साक्षी म्हस्के, प्रथमेश खटावकर, नितेश पिसे, केतन सावंत, विजय धुरी, निलेश राणे, सुधीर राणे, बाळकृष्ण तळेकर, संदीप घाडीगावकर, नरेश वरुणकर,दीपक नर
नांदगाव येथे रवींद्र तेली, हनुमंत म्हसकर, प्रफुल्ल तोरसकर, इमाम नावलेकर, तात्या निकम, व्यंकटेश वारंग, हेमंत कांडर, बाबू घाडी, प्रदीप हरमळकर, भाऊ रांबाडे, संभाजी पाटील, प्रसन्ना म्हाडेश्वर आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × four =