You are currently viewing ४७ पैकी २३ ग्राम पंचायतवर भाजपची सत्ता

४७ पैकी २३ ग्राम पंचायतवर भाजपची सत्ता

ठाकरे सेनेची १२ ग्राम पंचायतवर तर १० ठिकाणी गाव पॅनलची सत्ता

मालवण

मालवण तालुक्यात ४७ ग्रामपंचायती साठी झालेल्या निवडणुकीत भाजपने २३ ग्रामपंचायतीवर विजय संपादन केला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने १२ ग्रामपंचायतीवर भगवा फडकविला आहे. तर १० ग्रामपंचायतीवर गाव पॅनलची सत्ता आली आहे.तालुक्यात प्रतिष्टेच्या बनलेल्या देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने या एका ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला

मालवण तालुक्यातील ४६ सरपंच आणि ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी आज कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे पार पडली. मतमोजणी केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळी आठ वाजल्यापासून मालवण तंत्रनिकेतनकडे जाणारे रस्ते हे वाहनांनी भरून गेले होते. गावागावातील सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हे मतमोजणी केंद्राच्या बाहेर दाखल होत होते मालवणचे तहसीलदार प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खाली आणि नायब तहसीलदार श्री. कोकरे यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रियेस सुरवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात वीस ग्रामपंचायतींची मतमोजणी तर दुसर्‍या टप्प्यात वीस ग्रामपंचायतीची मतमोजणी आणि शेवटच्या टप्प्यात सात ग्रामपंचायतीची मतमोजणी पार पडली. मतमोजणीच्या काळात तसेच कोणताही अनुचित प्रकार घडूनम्हणून पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचे पथक तैनात ठेवण्यात आले होते. तीन टप्प्यात झालेली मतमोजणी सायंकाळी चार वाजता अत्यंत शांततेत आणि सुरळीत पणे पार पडली.

४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ४६ सरपंच पदासाठी निवडणुक झाली. यात २३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. यात सर्जेकोट,
मिर्याबांदा, माळगाव, तिरवडे, मालोड, हडी, वायांगवडे, निरोम, मठाबुद्रुक, अजगणी, किर्लोस, वडाचापाट, गोठणे, नांदोस, हेदुळ, पोईप, धामापूर, महान, हिवाळे, आंबेरी, वरची गुरामवाड, सुकळवाड, त्रिंबक, कुंभारमाठ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीत बारा ठिकाणी यश संपादन केले आहे. यात श्रावण, असरोंडी, वायंगणी, कोळंब, कांदळगाव, रेवंडी, रामगड, तळगाव, बुधवळे, बांदिवडे बुद्रुक, राठीवडे, वायरी भूतनाथ या गावांचा समावेश आहे.

तालुक्यात प्रतिष्टेच्या बनलेल्या देवबाग ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपला झेंडा फडकवला आहे. या ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून उल्हास तांडेल हे विजयी होतानाच त्यांनी सरपंच पदाचे अपक्ष उमेदवार नादार तुळसकर यांच्यावर केवळ एक मताने विजय संपादन केला आहे. या ग्रामपंचायतीमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर फेकले गेले आहेत.

या निवडणुकीत गाव पॅनेलने सर्वच पक्षांना आपली ताकद दाखविली. मालवण तालुक्यात दहा ठिकाणी गाव पॅनल विजयी झाली आहेत यामध्ये चाफेखोल, तोंडवळी, नांदरुख, खोटले, वेरळ, वराड, तारकर्ली, देवली, ओवळीये या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीत काही प्रस्तापित उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. तारकर्लीच्या सरपंच सौ. स्नेहा केरकर, माळगावचे निलेश खोत, हेदुळचे नंददीपक गावडे, ओवळीयेचे अंबाजी सावंत यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या निवडणुकीत कोळंब, कांदळगाव, रेवंडी, राठीवडे या भाजपच्या ग्रामपंचायती शिवसेनेने हिसकावून घेतल्या आहेत तर आनंदव्हाळ ग्रामपंचायतीच्या दोन सदस्य पदाच्या निवडणुकीत अनिल सुकाळी आणि श्रुती सुकाळी या भाजपच्या उमेदवारांनी विजय संपादन केला आहे.

तालुक्यातील 47 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यात भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळविले तर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाने प्रतिष्ठेच्या बनलेल्या ग्रामपंचायती ताब्यात मिळविण्यात यश मिळविले.
ग्रामपंचायतनिहाय विजयी झालेले सरपंच असे- श्रावण- नम्रता मुद्राळे (289), निरोम- बाबाजी राऊत (229), रामगड- शुभम मटकर (284), मठबुद्रुक- मोहन वेंगुर्लेकर (314), बुधवळे-कुडोपी- संतोष पानवलकर (178), गोठणे- दिप्ती हाटले (253), किर्लोस- साक्षी चव्हाण (293), राठिवडे- दिव्या धुरी (436), त्रिंबक- किशोर त्रिंबककर (418), हिवाळे- रघुनाथ धुरी (367), ओवळीये- रंजना पडवळ (371), असरोंडी- अनंत पोईपकर (415), बांदिवडे बुद्रुक- अनंत मयेकर (283), तोंडवळी- नेहा तोंडवळकर (400), वायंगणी- रूपेश पाटकर (487), कोळंब-सिया धुरी (622), हडी- प्रकाश तोंडवळकर (399), कांदळगाव- रणजित परब (335), महान- अक्षय तावडे (138), रेवंडी- अमोल वस्त (254), मिर्याबांदा- नीलिमा परूळेकर (476), वेरळ- धनजंय परब (272), माळगाव- चैताली साळकर (272), मालोंड- पूर्वा फणसगावकर (247), पोईप- श्रीधर नाईक (444), वडाचापाट- सोनिया प्रभुदेसाई (494), चाफेखोल-राजलता गोसावी (157), नांदरूख- रामचंद्र चव्हाण (157), सुकळवाड- युवराज गरूड (577), नांदोस- माधुरी चव्हाण (397), तिरवडे- रेश्मा गावडे (215), हेदूळ- प्रतिक्षा पांचाळ (299), तळगाव- लता खोत (502), खोटले- सुशील परब (185), वायंगवडे- विशाखा सकपाळ (224), वराड- शलाका रावले (846), वरची गुरामनगरी- शेखर पेणकर (829), धामापूर- मानसी परब (398), आंबेरी- मनमोहन डिचोलकर (437), देवली- शामसुंदर वाक्कर (585), चौके- गोपाळ चौकेकर (327), कुंभारमाठ- पूनम वाटेगावकर (490), देवबाग- उल्हास तांडेल (355), तारकर्ली-काळेथर- मृणाली मयेकर (689), वायरी भुतनाथ- भगवान लुडबे (519)

शिवसेना भाजप चे दावे – प्रतिदावे

मालवण तालुक्यात ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तसेच भाजपने दावे प्रतिदावे केले असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मालवण तालुक्यात १८ ग्रामपंचायतींवर भगवा फडकल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख श्री. हरी खोबरेकर यांनी दावा केला आहे. तर मालवण तालुक्यात ४० ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच बसतील असा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केला आहे.

दरम्यान, मालवण तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाला मिळालेले यश हे अपेक्षेपेक्षा ज्या आहे कारण पक्षाच्या फुटीनंतर झालेली ही पहिलीच निवडणूक असल्याने आणि आमच्यावर राज्यातील सत्ताधाऱ्यांनी लावलेली खोटी चौकशी याचा परिणाम होऊ न देता तालुक्यातील जनतेने आमच्या पक्षावर आणि माझ्यासह पक्षाच्या उमेदवारांवर जो विश्वास दाखवला तो विश्वास आम्ही सार्थ ठरवू. गावच्या विकासात पक्षीय राजकारण न आणता विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. लोकांनी आमच्या पक्षावर हेच प्रेम आणि आशीर्वाद ठेवावेत असे भावनिक प्रतिपादन मालवण कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी करताना मतदारांचे त्यांनी जाहीर आभार मानले आहेत.

मालवणात मनसेने खाते खोलले.

मालवण तालुक्यात आज ४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर मनसेने देवबाग आणि चौके ग्रामपंचायती मध्ये आपला प्रत्येकी एक सदस्य निवडून आणून खाते उघडले आहे यापूर्वी या निवडणुकीत मनसेच्या तिघे जण बिनविरोध निवडून आले होते त्यात आता नव्याने दोन सदस्यांनी विजय संपादन केल्याने मनसेच्या खात्यात पाच ग्रा. प. सदस्यांची भर पडली आहे. त्यामुळे मनविसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांनी आनंद व्यक्त केला आहे.

देवबाग मनसे उमेदवार पास्कोल राॕड्रीक्स यांचे मनसेच्या अमित इब्रामपूरकर व इतर पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले यावेळी अमित इब्रामपूरकर, माजी तालुका सचिव विल्सन गिरकर,माजी तालुका अध्यक्ष रामनाथ पराडकर, माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर,मनसे विद्यार्थी सेना माजी तालुका अध्यक्ष संदीप लाड,विद्यार्थी सेना माजी शहर अध्यक्ष वैभव माणगावकर, अभिजित मेथर, लौकिक अंधारी आदी उपस्थित

प्रतिक्रिया व्यक्त करा