You are currently viewing सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या मागण्यांकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे लक्ष…

सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या मागण्यांकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे लक्ष…

सकारात्मकपणे मागण्या सोडविण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमित सैनी यांची ग्वाही

नौका प्रवासी वाहतूक विमा रक्कम ५ लाखावरून १ लाख करणे, सिंधुदुर्ग मध्ये जलमार्गावरील प्रवासी वाहतूक क्षमता वाढविणे, प्रवासी वाहतूक मुदत वाढविणे यांसह सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या अन्य मागण्यांबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमित सैनी यांची भेट घेतली. व सदर मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यावर डॉ.अमित सैनी यांनी नौका प्रवासी वाहतूक विमा ५ लाखावरून १ लाख करण्याबरोबरच इतर मागण्या देखील सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली.तसेच वाळू व्यवसायिकांच्या प्रश्नांबाबत यावेळी सकारात्मक चर्चा झाली.

गेल्यावर्षी वादळी हवामान व कोरोनाच्या संकटामध्ये पर्यटकांची संख्या कमी झालेली असून मार्च २०२० पासून पर्यटन व्यवसाय बंद झालेला आहे. प्रवाशी नौका व्यवसायिकांच्या उदरनिर्वाहाच प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे या व्यवसायिकांना वाचविणे गरजेचे आहे.याकडे आ.वैभव नाईक यांनी अमित सैनी यांचे लक्ष वेधले.
मालवण बंदर धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला व तारकर्ली या जलमार्गावर अनेक प्रवासी वाहतूक नौका असून या व्यवसायिकांनी २०२०-२०२१ या वर्षाकरीता प्रवासी वाहतूक परवाना ऑनलाईन मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले असता त्याच्याजवळ प्रवाशी वाहतूक विमा रक्कम रुपये ५.०० लाख चा काढलेला नसल्याने त्यांचे प्रस्ताव मागे आलेले आहेत. नौका प्रवाशांचा विमा ५ लाखा प्रमाणे उतरविल्यास त्यासाठी एका नौकेला जवळ जवळ रुपये ३० हजार चा हप्ता भरावा लागणार तो व्यावसायिकांना परवडणारा नसल्याने विम्याची रक्कम कमी करून पूर्वीप्रमाणे १लाख करण्यात यावी अशी मागणी सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनने आमदार वैभव नाईक यांच्याकडे केली होती.
तसेच महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने प्रवासी वाहतूक बोटीचा सर्व्हे करण्यासाठी सर्व्हेअरची नियुक्ती प्रत्येक जिल्हा कार्यालयात करणे आवश्यक आहे. १० टना खाली असलेल्या नौकांचा सर्व्हे करण्याचा अधिकार प्रादेशिक बंदर अधिकारी यांना देण्यात यावा. मालवण बंदर धक्का ते सिंधुदुर्ग किल्ला व तारकर्ली या जलमार्गावरील प्रवासी वाहतूक क्षमता वाढविण्यात यावी. सद्या प्रवासी वाहतूक क्षमता प्रवासी १० व चालक व खलाशी २
अशी एकुण (१२) बारा असते ती वाढवून किमान २५ प्रवासी वाहतूक करण्याचा परवाना दयावा जर १० संख्या ठरविल्यास आजच्या महागाईत ते परवडणारे नाही
इनलॅण्ड व्हेसल अॅक्ट १९१७ अंतर्गत करण्यात येणा-या सर्व प्रकारच्या नोंदणीचे शुल्क ठरविलेले होते त्यांनतर शुल्कामध्ये फेरफार केला असून मालकी हक्कात बदल करणे व नौकेचे इंजिन बदलणे हे शुल्क कमी केलेले नाही. तसेच नोंदणी प्रमाणपत्राची दुय्यम प्रत मिळणे व नोंदणी प्रमाणापत्रावर कर्जाची नोंद करणे यामध्ये यावर कीती शुल्क वसूल करावे हे ठरविलेले नाही त्याबाबत योग्य निर्णय व्हावा

प्रवासी वाहतूक हंगाम १ सप्टेंबर ते २५ मे
असा असल्याने व प्रवासी वाहतूक २६ मे नंतर बंद करत असल्याने परंतु पर्यटकांची गर्दी १० जून पर्यंत असल्याने प्रवासी वाहतूक मुदत १० जून पर्यंत करण्यात यावी. जर पाऊस अगोदर सुरु झाल्यास प्रवासी
वाहतूक बंद करण्यात येईल. कोरोना आजारामुळे पर्यटन
हंगाम बंद करण्यात आलेला असून त्यामुळे व्यवसायिकांवर उपासमारीची वेळ आलेले आहे. तरी पर्यटन हंगाम सुरू होण्यास परवानगी दयावी
सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी वाहतूक वेल्फेअर असोसिएशनच्या या सर्व मागण्या आ.वैभव नाईक यांनी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अमित सैनी यांच्याकडे मांडल्या आहेत.या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून त्या सोडविल्या जातील असे डॉ.अमित सैनी यांनी सांगितले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 4 =