You are currently viewing एक राऊत आत गेले, दुसरे आता मैदानात.. हेच राऊत पक्ष संपवणार

एक राऊत आत गेले, दुसरे आता मैदानात.. हेच राऊत पक्ष संपवणार

*दीपक केसरकर यांचा सिंधुदुर्गातील पत्रकारांशी संवाद*

 

सावंतवाडी :

 

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांची सावंतवाडी शहरात सभा झाल्यानंतर सायंकाळी उशिरा शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते तथा सावंतवाडी मतदार संघाचे विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांशी झूम ॲपद्वारे संवाद साधला. माझ्या विरोधात वक्तव्य केले त्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली, याची त्यांनी आठवण करून दिली. सावंतवाडीकर माझ्या बाजूने आहेत. त्यामुळे ते नक्कीच माझ्यावर झालेल्या टिकेला उत्तर देतील, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

एका राऊतांना अटक झाली, आता दुसरे राऊत मैदानात उतरले आहेत. ते त्यांच्यापेक्षा शिवसेनेची हानी करतील, असाही टोला त्यांनी लगावला.

टीकेला मी सावंतवाडीत आल्यानंतरच उत्तर देईन,सध्या मी शिंदे गटाची जबाबदारी सांभाळत आहे. त्यामुळे राज्य, देशपातळीवर मला बोलावं लागतं. त्यामुळे तूर्तास मला वेळ नाही. परंतु सावंतवाडीत आल्यावर मी टीकेला सविस्तर उत्तर देईन. असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा