You are currently viewing अत्यग्निष्टोम महासोमयाग यज्ञाचे 5 ते 10 फेब्रुवारीला आयोजन

अत्यग्निष्टोम महासोमयाग यज्ञाचे 5 ते 10 फेब्रुवारीला आयोजन

डेक्कन जिमखाना,पुणे-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)

प्राचीन यज्ञीय जीवनाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची आणि चारही वेदातील मंत्रांचे एकाच वेळी श्रवण करण्याची दुर्मिळ संधी वेद, संहिता – श्रुती (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद) यावर आधारित विश्व कल्याण आणि प्रत्येकाला विशेष दैवी अनुभव प्रदान करणारा अत्यग्निष्टोम महासोमयाग – 5 ते 10 फेब्रुवारी 2024 निवासी यज्ञ – ठिकाण – श्रीपुरुषोत्तम मंदिर, तेंडोली, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे आयोजीत केला आहे.

वैश्विक सोमयाग संकल्प अंतर्गत पहिल्या अत्यग्निष्टोम महासोमयाग यज्ञाचे आयोजन केले आहे. भीष्म फाउंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम वैदिक आणि भारतीय ज्ञान परंपरांचा व्यावहारिक उपयोग प्रत्यक्ष जीवनात प्रस्तुत करण्यासाठी विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करत आहे. येत्या दहा वर्षांत भारतात १०८ ठिकाणी आणि भारताबाहेर १०८ ठिकाणी महासोमयाग यज्ञांचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा अत्यग्निष्टोम महासोमयाग यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण यज्ञाची, यज्ञ परंपरेची आणि सोमयागाची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी कृपया Www.Mahasomyag.Org या संकेत स्थळावर मिळू शकेल.

सनातन भारतीय संस्कृती, वैदिक संस्कृती, हिंदू संस्कृती ही मुळात यज्ञसंस्कृती आहे. सर्वे भवंतु सुखिन:, विश्व कल्याण, वसुधैव कुटुंबकम् या मूलभूत भारतीय जीवन विचार आणि जीवनपद्धती आहेत. मंत्रशास्त्र हे एक अद्भुत शास्त्र आहे. विश्व कल्याण आणि विश्व शांती हा या यज्ञाचा मुख्य हेतू आहे. एका विलक्षण अद्भुत अशी दैवी ऊर्जेची अनुभूती या यज्ञा दरम्यान अनुभवता येते. याचबरोबर ऋतुचक्राचे संतुलन, पंचमहाभूतांचे संतुलन, वायुमंडळाची शुद्धी, पर्यावरण शुद्धी, ग्लोबल वॉर्मिंग पासून मुक्ती, वैश्विक ऊर्जा संतुलन यासाठी हा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीसाठी आरोग्य प्राप्ती, समाधान, संतोष प्राप्ती, ऑरा शुद्धी, पंचकोष शुद्धी, कौटुंबिक सुख – समृद्धी यासाठी हा यज्ञ लाभदायक आहे. या सोमयागात ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चार वेदांच्या मंत्रांचे पठण केले जाईल. यामुळे देवी ऊर्जा निर्माण होते असा विश्वास आहे. हा सोमयाग स्थूल शरीरावर, सूक्ष्म शरीरावर आणि कारण शरीरावर परिणाम करतो अशी मान्यता आहे. या यज्ञाच्या आणि मंत्रजागराच्या माध्यमातून भौतिकशास्त्र, मानसशास्त्र आणि सृजनशास्त्राचा अनुभव घेता येणार आहे. भारतीय तत्त्वज्ञानाची महानता आपण या यज्ञाच्या माध्यमातून अनभवू शकू.

यज्ञोपचार (यज्ञ पॅथी): यज्ञ ही एक प्राचीन उपचार पद्धती आहे. हविर्द्रव्याच्या आहुतीमुळे मंत्रजागर आणि अरोमा थेरपी ( गंध थेरपी ) सहभागी व्यक्तींचे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आजार सुधारण्यास मदत करते.

या अत्याग्निष्टोम महासोमयागात सनीहर म्हणजे यज्ञाचे अधिकृत प्रतिनिधी आणि कल्याणार्थी म्हणजे यज्ञाचे हितचिंतक बनून सहभागी होता येईल. यज्ञ संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्याचा हा प्रयत्न आहे. हे दैवी कार्य आहे. आज सारे विश्व वेगवेगळ्या समस्यांशी झुंजत आहे. यावेळी केवळ सनातन भारतीय हिंदू वैदिक संस्कृती आणि भारतीय ज्ञान परंपरा जगाचे संरक्षण आणि संवर्धन करू शकते असा आम्हाला विश्वास वाटतो.

यज्ञ ठिकाणाजवळ स:शुल्क निवास व्यवस्था उपलब्ध आहे. भोजन महाप्रसाद भंडारा यज्ञाच्या निमित्ताने आयोजित केला आहे.

अधिक माहितीसाठी कृपया www.Mahasomyag.Org
या संकेस्थळाला भेट द्या. 8421951262 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर तेंडोली सोमयाग असा मेसेज पाठवूनही माहिती मिळवा.

आयोजक – भीष्म फाउंडेशन फॉर भारतीय नॉलेज सिस्टीम 622 जानकी रघुनाथ पुलाची वाडी, डेक्कन जिमखान्याजवळ, पुणे 411004 संपर्क – 8421951262

प्रतिक्रिया व्यक्त करा