You are currently viewing महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी सदानंद रावराणे यांची निवड….

महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पदी सदानंद रावराणे यांची निवड….

वैभववाडी

मुंबई येथील जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक तथा मिलिंद विद्यालय पवईचे अध्यक्ष, उद्योजक, वैभववाडी तालुक्यातील एडगाव गावचे सुपुत्र सदानंद दत्ताराम रावराणे यांची महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेच्या आनंदीबाई रावराणे सिनिअर कॉलेजच्या कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.
सदानंद दत्ताराम रावराणे हे वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल त्यांना उत्कृष्ट संस्थाचालक तसेच समाजभूषण अशा अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रदिर्घ अनुभव व योगदान लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडी बद्दल जिल्ह्यातील शिक्षक संघटना, शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग यांच्या कडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा