You are currently viewing अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच नमू डायनॅमिक आर्ट च्या वतीने विद्यालयात व्यसनमुक्ती वर आधारित पथनाट्याचे सादरीकरण

वैभववाडी

आज दि.१ ऑगस्ट २०२२ रोजी वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी निमित्त सांस्कृतिक विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


प्रशालेतील इ. १० वी ब तसेच १२ वी विज्ञान या वर्गांच्या वतीने प्रशालेस अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमा वर्गशिक्षिका भोसले एस.व्ही., पाटील पी.ए. तसेच वर्ग प्रतिनिधी प्राप्ती बाणे,सिद्दिक हवालदार, वेदांत पाटील, दिव्या घवाळी यांनी भेट स्वरूपात प्रशालेचे मुख्याध्यापक नादकर बी.एस. यांच्याकडे सुपूर्द केल्या. प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयातील पार्थ पवार, सलमा शेख, ब्रिजेश तुळसणकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक शिंदे सर यांनी ‘माझी मैना गावाकडं राहीली’ ही शाहिरी सादर करुन अण्णाभाऊ साठे यांना आदरांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर यांनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु.दिक्षा ढेकणे हिने केले तर आभार प्रदर्शन कु.वेदांत पाटील याने केले.


लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच नमू डायनॅमिक आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने संदीप सावंत, तेजस म्हस्के, विघनेश पाटकर, विठ्ठल तळवलकर, मनिष पाटकर, रुचिता शिर्के, यश पाकरे यांनी ‘व्यसनाची साथ करी जिवनाचा घात’ हे पथनाट्य विद्यालयाच्या प्रांगणात सादर केले.
या कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक बी.एस.नादकर, एस. बी. शिंदे., उच्च माध्यमिक व माध्यमिक विभाग प्रमुख पी.एम.पाटील. सौ.एस.एस.पाटील,पी.जे.सावंत., सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.एस.चोरगे., वाय.जी.चव्हाण. विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व इयत्तेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − eight =