You are currently viewing काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी घेतली खासदार सुनील तटकरे यांची भेट.

काळाधोंडा येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी घेतली खासदार सुनील तटकरे यांची भेट.

समस्या सोडविण्याचे तटकरे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन.

उरण –

रायगड जिल्हा :-उरण तालुक्यातील कोटनाका काळाधोंडा येथील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडको व रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे रेल्वे प्रकल्पासाठी संपादित केले मात्र त्याबदल्यात आजपर्यंत येथील शेतकऱ्यांना कोणतेही मावेजा, मोबदला अथवा नुकसान भरपाई मिळालेली नाही. सिडको व रेल्वे प्रशासन चर्चेला सुद्धा तयार नाही.

सुरवातीपासूनच रेल्वे व सिडको प्रशासनाने येथील शेतकऱ्यांच्या महत्वाच्या समस्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. रोजगार नसल्याने या शेतकऱ्यांवर, त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे रेल्वे व सिडको प्रशासना विरोधात शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा तसेच कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी -कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुनील तटकरे यांची
भेट घेतली. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी या विषयावर खासदार तटकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. व या समस्या सोडविण्याची मागणी तटकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी स्थानिक रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकरी कृती सेवा संस्था काळाधोंडा व कोट ग्रामसुधारणा मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार तटकरे यांनी सकारात्मक भूमिका घेत काळाधोंडा येथील शेतकऱ्यांना योग्य ते न्याय देण्याची भूमिका घेतली. तटकरे यांनी लवकरच संघटनेची प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी, सिडकोची व रेल्वे प्रशासनाची संयुक्त बैठक घेणार असल्याचे सांगितले. या स्थानिक व भूमीपुत्र असलेल्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांनी जातीने लक्ष घालून पुढाकार घेतले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − ten =