You are currently viewing मसुरे देऊळवाडा येथे १० नोव्हेंबर ला गुरुद्वादशी उत्सव

मसुरे देऊळवाडा येथे १० नोव्हेंबर ला गुरुद्वादशी उत्सव

मालवण :

 

श्री समर्थ बागवे महाराज संस्थान मसुरे देऊळवाडा येथील दत्तमंदिरात १० नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ ते ११ वा. दत्तात्रेयांच्या मूर्तीची विधियुक्त पूजा अर्चा व अभिषेक, दुपारी १२ वा. श्रींची महाआरती, १ ते ३ वा. महाप्रसाद, सायंकाळीं ७ ते ९ वा. स्थानिकांची सुश्राव्य भजने, रात्रौ ठीक ९:३० वा. दत्तमाऊली दशावतार नाटय मंडळ, सिंधुदुर्ग यांचा “सहस्त्रनागबळी” हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या कार्यक्रमांचा लाभ भाविक रसिकांनी घ्यावा असे आवाहन श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा