You are currently viewing भुताखेतांच्या गोष्टी

भुताखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे, लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*भुताखेतांच्या गोष्टी*

( क्रमांक १६ वा )

➖➖➖➖➖➖➖➖

मराठी भुताखेतांच्या गोष्टी या फेसग्रूपमुळे साहित्यातील या वेगळ्या विषयाकडे मी अचानक वळलो ..माझी या आधी अनेक विषयावर 35 पुस्तके मी लिहिली .पण हा विषय एकदम वेगळा समोर आला .लोकांची उत्तसुकता ही दिसली ..अजूनही काही भूतकथा आठवतात ..लिहीण्याचा प्रयत्न करतो आहे ..पाहुया या कथांचेही एकत्रित एक छोटे पुस्तक काढूया असे वाटते आहे ..!

माझ्या कथा बहुअंशी ५० ते ६० वर्षापूर्वीच्या आहेत ..! रसिक वाचकांनो ,तुम्हिही या पूर्वीच्या काळाची कल्पना करु शकता ..आज सारे प्रचंड प्रगत वैज्ञानीक वातावरण आहे , सारेच बदलले आहे . पूर्वी आज आहे त्यापेक्षा लोकसंख्या खुपच कमी होती . दळणवळणाची साधनेही नगण्य होती .एखाद्या व्यक्तीकड़े सायकल असली तरी तो श्रीमंत वाटत असे ..

मोठमोठ्या शरहरात पूर्वी ट्राम , टांगे , बग्गया , सायकल रिक्षा , सायकली , बैलगाड़ी अशीच वहाने होती .. रस्ते छोटे होते ..वस्तीही मर्यादित होती .. जूनी वीटामातींची , दगडांची घरे , वाडे होते .. भरपूर झाड़ी होती ,नैसर्गिक रेलचेल होती . स्वस्ताई होती .साधे रहाणीमान होते ..मोजक्याच घरी लाईट होती .

पहाटे मंदिरात काकड़आरती , घन्टानाद पूजाअर्च्या , मशिदित बांग , राजेरजवाड्यात चौघडे नगारे वाजत असत . असे छान वातावरण होते.

खेड़यामद्धये तर तिन्हीसांज झाली अगदी सामसुन , शुकशुकाट होत असे काही बुजुर्ग मंडळी गावाच्या चावड़ीवर किंवा पारावर गप्पा मारीत बसत ..त्या गप्पात अनेक मजेशीर गप्पा असत . त्यात भुताखेतांच्याही गप्पा देखील असत ..त्याकाळी एक मुसाभाई म्हणून एक खुप गरीब पण खुप विनोदी कष्टकरी , हसरी अशी पन्नाशीची व्यक्ती होती . त्याचे मोठे कुटुंब ६ मुले आणी हे दोघे ८ माणसांचे कुटुंब ..छ्त्रया दुरुस्त करण्याचा व्यवसाय करीत असे ..मुले देखील काम करीत असत ती मुले माझी मित्रच होती . गरीबी असून देखील सदाआनंदी कुटुंब हे त्यांचे वैशिष्ठ्य होते ..मुसाभाईंचे छोटेसे स्वतःचे घर होते ..पण उर्जितावस्था नव्हती ..खुप कष्ट करीत सर्वजण ..मुसाभाई म्हणजे ६ ‘ ऊंच ,सडसडीत बांधा ,सलवार कुर्ता व त्यावर चॉकलेटी कोट आणी डोक्यावर तपकिरी मोठ्ठी गोंडयाची टोपी , सावळा रंग , पांढरे स्वच्छय पण पान खावून लालसर झालेले व पुढे आलेले दात असलेलं अवलिया (विदूषकी ) व्यक्तिमत्व ..सर्वात हसत मिसळणारं ..!

पूर्वी गावात लाईट नसल्यामुळे ग्रामपंचायत , म्युनिसिपालिटी देखील गल्लोगल्ली मोकयाच्या ठिकाणी लाकडी खांबाबर रात्री रॉकेलच्या बत्त्या लावत असे ..गावात मशिदिहि होत्या , दरगाह , पीर अशी ठिकाणे होती ..रात्री मुसाभाई तिथे बत्त्या घेवून जाणे , आणी रात्री तिथे राखणीचे ( वॉचमैन ) चे काम करीत असत . रात्री अपरात्री हातात काठी घेवून फिरत असत ..

त्यांच्याच शब्दात …….!!!

“एक दिन मेरे घर मेरा साला आया , घर छोटा था तो मैंने उसे मेरे साथ दरगाह में लेके गया ड्यूटी करते करते रातको हम गप्पा मारते मारते उस दरगाहके लोखंडी शेडके दरवाजको कुलुप लगाके दरगाहमे अंदरही सो गए …सुबह हो गयी और देखा हम दोनोको किसीने उठाकर उस शेडके बाहर रख्खा था । हमें कुछ भी पता नही चला । दरवाजाका कुलुपभी बंद था । हमको कुछ समझा नही ..इसके पहले मैं तो कभी भी अंदर सोया नही था , आज साले साथ अंदर सोया तो ये घटना घड़ी ..फिर मैंने मौलाना को पुछ्या तो बोला , ये जिसका दरगा है वो हस्ती यहाँ है । कुराण भी पढ़ती है । किसीकोभी अंदर सोने नही देती ..बहुतसे फ़क़ीरोंकोभी ये अनुभव आया है , कुछ फ़कीरोने उस हस्तिकी आवाज भी सुनी है । जो कोई सोया है उसे बाहर रख दिया जाता है । ये अनुभव है ।

तब मुझे पता चला की यहाँ कुछ तो गड़बड़ है , अबतक मैं ड्यूटी करता था इसके बारेमे कुछभी मैंने सोचा नही था । लेकिन रातके समय मैंने उस दरगेसे बहुतसी बार जैसे फ़क़ीर धूप जलाता है और सुगंध आती है , उसी तरहकी सुगंध महसूस की है ..मैं ड्यूटी करता रहा …..

मेरे घरमे तो छोटासा दरगाह और ताबूत के पंजे थे मैंने उसका कभी गौर नही किया उसकी तरफ कभीभी ध्यान नही दिया ……कभीभी वहाँ धूपभी नही जलाया ।..

कुछ दिनके बाद मेरी निजी हालत बहुत खराब हुई , सारी शांती चली गयी । मैंने घर बेच दिया . दूसरा किरायेसे ले लिया ..लेकिन ओ घर छोड़ने बाद कुछ बरसमें मेरी हालत सुधर गयी ।…….

ही गोष्ट माझ्या समोरची आहे . मुसाभाईंचे सर्व कुटुंब अत्यंत सुपन्न अवस्थेत आज मोठ्या शहरात स्वतःच्या सुंदर वास्तुत रहात असून माझ्याच बरोबरीची मुले आज मोट्ठा व्यवसाय करीत आहेत . हा एक भाग …तर दूसरा भाग म्हणजे …..

मुसाभाईंचे घर ज्यांनी घेतले त्यांनी त्या घरातील छोट्या दरग्याची , ताबुतांची , पंजांची योग्य ती विल्हेवाट लावून , ते घर पाडून तिथे तीन मजली इमारत बांधली असून ते कुटुंब आज अत्यंत सधन अवस्थेत नांदते आहे ……( संक्षिप्त).

*©विगसा*

➖➖➖➖➖➖➖➖

 

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + 8 =