You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत

आ. वैभव नाईक यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत

क्रेनद्वारे फुलांचा हार घालून शुभेच्छांचा केला वर्षाव!

आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कुडाळात शिवसैनिकांचा जनसागर

निष्ठा यात्रेनिमित्त सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेले युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदारसंघात जंगी स्वागत करण्यात आले. चिपी विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे आगमन झाल्यानंतर,पिंगुळी तिठा मार्गे कुडाळ येथील शिवसेना शाखेला त्यांनी भेट दिली. आदित्य ठाकरे यांच्या स्वागतासाठी कुडाळ येथे शिवसैनिकांचा जनसागर लोटला होता.यावेळी क्रेनच्या सहाय्याने फुलांचा भला मोठा हार घालून आदित्य ठाकरे यांचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. आदित्य ठाकरे यांनी हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. शिवसेना जिंदाबाद,बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आदित्य ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी आदित्य ठाकरे यांनी गद्दार आमदारांचा समाचार घेत शिवसैनिकांना संबोधित केले.


यावेळी खासदार विनायक राऊत,सिने अभिनेते आदेश बांदेकर, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार राजन साळवी,आमदार वैभव नाईक, उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, माजी जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, अतुल रावराणे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, मंदार शिरसाट,युवासेना जिल्हा समन्वयक गीतेश कडू,राजू राठोड,सुशील चिंदरकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन शिंदे, तालुका प्रमुख हरी खोबरेकर, राजन नाईक, नागेंद्र परब, संघटक बबन बोभाटे, उपसभापती जयभारत पालव,राजू कविटकर, बाबी जोगी, संतोष शिरसाट, कृष्णा धुरी,योगेश धुरी, रुपेश पावसकर, अतुल बंगे, महेश कांदळगावकर, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये,किरण शिंदे , उदय मांजरेकर, श्रेया परब, स्नेहा दळवी,मथुरा राऊळ ज्योती जळवी, श्रुती वर्दम,श्रेया गवंडे, सई काळप,नितीन सावंत, संजय भोगटे, सचिन काळप, राजू गवंडे, कृष्णा तेली, संदीप म्हाडेश्वर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा