You are currently viewing स्वयंदीप प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ मालवणच्या वतीने गरजू विद्यार्थी आणि दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

स्वयंदीप प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ मालवणच्या वतीने गरजू विद्यार्थी आणि दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव

स्वयंदीप प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ मालवणचे कार्य जिल्ह्याला आदर्श व्रत …… भगवान जाधव

 

मालवण (मसुरे) :

स्वयंदीप प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ मालवणच्या वतीने मालवण तालुक्यातील गरजू विद्यार्थी आणि दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम मसुरे येथे भगवान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. गावागावातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करून एक प्रकारची क्रांती या मंडळाने घडविली आहे. स्वयंदीप प्रतिष्ठानचा हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्याला आदर्श व्रत असा आहे, असे मत स्वयंदीप प्रतिष्ठान विश्वस्त मंडळ मालवणचे अध्यक्ष भगवान जाधव यांनी मसुरे येथे बोलताना केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना मसुरे मंडल अधिकारी सुहास चव्हाण म्हणाले आज विद्यार्थ्यांच्या पाठीवरती या प्रतिष्ठानने जी कौतुकाची थाप मारलेली आहे. यातून या प्रतिष्ठानने सामाजिक बांधिलकी जपली आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी अनेक शाळा, सामाजिक संस्था, होतकरू विद्यार्थी यांना शैक्षणिक आर्थिक सहकार्य केले आहे हे सुद्धा या जिल्ह्याला भूषण वाह आहे. गुणवंत सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करून मिळालेल्या संधीचे सोने करायला शिका असे सांगितले. या वेळी व्यासपीठावरती मंडळ अधिकारी श्री सुहास चव्हाण, कोडीव्य पवार, शरद मोरे, नारायण पांचाळ, प्रीतम जाधव, राजेंद्र जाधव, गुरुदास जाधव, मिलिंद जाधव, दिक्षिता वराडकर, शैलेश मसुरकर, संतोष तांबे, रुपेश तांबे, प्रवीण सावंत, अर्पिता तोंडवळकर, खूषी परब, लौकिक भोगले, शुभम पाटील, श्रावणी मोरे, योजना मोरे, गणेश पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन कोडीव्य पवार आणि आभार शरद मोरे यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 5 =