You are currently viewing फळ पीक विमा योजनेची २२ कोटी ९४ लाख रक्कम जिल्हा बँकेकडे प्राप्त…

फळ पीक विमा योजनेची २२ कोटी ९४ लाख रक्कम जिल्हा बँकेकडे प्राप्त…

जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत

सिंधुदुर्गनगरी

फळ पीक विमा योजनेअंतर्गत चालू वर्षी विमा कंपनी कडून तब्बल २२ कोटी ९४ लाख येवढी नुकसान भरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे.सिधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ४ हजार ३८८ आंबा पीक विमा उतरलेल्या सभासद शेतकर्‍यांना मिळणार लाभ आहे. अशी माहीती जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिली

प्रधानमंत्री फसल विमा योजना २०१९ अंतर्गत जिल्ह्यातील आंबा व काजू बागायतर ५३३४ शेतकर्‍यांनी जिल्हा बॅंकमार्फत उतरविला होता २ कोटी ७२ लाखांचा विमा भारतीय कृषि विमा कंपनी मुंबई ( AIC) मार्फत हा विमा ऊतरविण्यात
आलाहोता पैकी आंबा शेतकर्‍यांसाठी २२ कोटी ९४ लाख इतकी विमा रक्कम जिल्हा बँकेकडे जमा झाल्याने कोरोना आपत्तीत आंबा बागायतदार शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे , जिल्हा बँकने अध्यक्ष सतीश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने संबधित विमा कंपनी व शासन स्तरावर केलेल्या पाठपुरव्याला मोठे यश मिळाले होते

यावर्षी सुद्धा आंबा व काजू बागायतदार यांनी ३० नोव्हेंबर पर्यंत शेतकर्‍यांनी आपली विमा रक्कम भरून विमा कवच घेण्याचे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी आवाहन केले आहे. या विमा नुकसान भरपाईत देवगड तालुक्यातील 1112 सभासदाना 3.72 लाख,कणकवली तालुक्यातील 422 सभासदाना 2.46 लाख, कुडाळ तालुक्यातील 4.84 लाख, मालवण तालुक्यातील 429 सभासदाना 2.50 लाख, सावंतवाडी तालुक्यातील 508 सभासदाना 3.84 लाख, वैभववाडी तालुक्यातील 146 सभासदाना 0.60;लाख, वेगुले तालुक्यातील 987 सभासदाना4.92 लाख असे एकुण 4306 सभासदाना 22 कोटी 94 लाख मिळणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − six =