You are currently viewing मालवणात राज्यपालांविरोधात शिवसैनिकांच्या चले जाव च्या घोषणा

मालवणात राज्यपालांविरोधात शिवसैनिकांच्या चले जाव च्या घोषणा

मालवण

चले जाव चले जाव… काळी टोपी चले जाव… मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध असो… अशा घोषणा देत आणि काळ्या टोप्या उडवत मालवण तालुका शिवसेनेतर्फे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई शहरातून गुजराथी आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्व स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना मालवण तालुका शिवसेनेतर्फेही राज्यपाल कोश्यारी यांचा मालवण शिवसेना शाखा येथे काळ्या टोप्या उडवून आणि घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, शिला गिरकर, जान्हवी कुमठेकर, दीपा शिंदे, प्रसाद आडवणकर, संमेश परब, अमेय देसाई, अनंत पाटकर आदी व इतर उपस्थित होते.

राज्यपाल या संविधानिक पदावरील व्यक्तीने समाजात तेढ निर्माण करण्याची व्यक्तव्ये करू नयेत. मात्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या वक्तव्यातून मराठी माणसाचा अपमान करत हिणवण्याचे काम केले आहे. राज्यपालांनी आपल्या कक्षेत राहूनच विधाने करावी, राज्यपाल सारख्या सर्वोच्च पदावर बसून तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणे हे अशोभनीय आहे. राज्यपाल या पदावर बसण्याची त्यांची योग्यता नाही, असे हरी खोबरेकर यांनी यावेळी सांगत राज्यपाल कोश्यारी यांचा मालवण शिवसेना जाहीर निषेध व्यक्त करत आहे, असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − two =