You are currently viewing पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाला कणकवली-देवगड- वैभववाडी मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाला कणकवली-देवगड- वैभववाडी मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांसमवेत पाहिला कार्यक्रम

“मन की बात”व्यापक स्वरूप जनते पर्यंत, सार्वजनिक ठिकाणी स्क्रीन द्वारे केले प्रसारण

कणकवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मन की बात” कार्यक्रमाला कणकवली-देवगड- वैभववाडी विधानसभा मतदारसंघात जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.व्यापक स्वरूपात घरोघरी हा कार्यक्रम पाहिला जावा,भारतीय जनता पार्टीच्या बुथवर त्याच प्रमाणेच सार्वजनिक ठिकाणी सुद्धा स्क्रीनवर मन की बात पाहता यावी यासाठी स्थानिक आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले होते.तर आमदार नितेश राणे यांनी लोरे येथे “मन की बात”कार्यक्रमात सहभाग घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसमवेत पूर्ण कार्यक्रम पाहिला. कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विचार घरोघरी पोहोचविण्यासाठी मन की बात कार्यक्रमाचे व्यापक स्वरूपात नियोजन करण्यात आले होते.प्रत्येक मन की बात कार्यक्रमाचे अशाच पद्धतीने प्रत्येक वेळी नियोजन केले जाते. या आजच्या मन की बात कार्यक्रमाला सुद्धा मागील कार्यक्रमा प्रमाणेच व्यापक स्वरूप प्राप्त झालेले होते. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक बुथवर कार्यकर्ते, पदाधिकारी एक वटून मन की बात कार्यक्रम पाहतात- ऐकतात त्याचप्रमाणे घराघरात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार आत्मसात करण्यासाठी मन की बात कार्यक्रम लावला जातो व पाहिलं जातो. आजच्या मन की बात कार्यक्रमात सुद्धा अबाल वृद्धांसह गृहिणी त्याचप्रमाणे पुरुषवर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी झाला होता. फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघात लोरे येथे मन की बात कार्यक्रम जनतेसाठी आयोजित केला होता, या कार्यक्रमात आमदार नितेश राणे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष राजन चीके, तालुका मंडल अध्यक्ष मिलिंद मिस्त्री, भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी तुळशीदास रावराणे, माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच अजय रावराणे, माजी सरपंच सुमन गुरव,मीडिया प्रमुख समीर प्रभूगावकर ,गणेश तळेगावकर, श्री मराठे यांच्यासह असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × five =