You are currently viewing वेंगुर्ल्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना टी-शर्टचे वाटप…

वेंगुर्ल्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षातर्फे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना टी-शर्टचे वाटप…

वेंगुर्ले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे फोटो असलेले टी-शर्ट याचे वाटप वेंगुर्ले तालुक्यातील बाळासाहेबांची शिवसेना गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

बाळासाहेबांची शिवसेना यांचे वेंगुर्ले तालुक्यात नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार कार्यक्रम नुकताच सावंतवाडी येथे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी बाळासाहेबांची शिवसेना वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या संकल्पनेतून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी आगळीवेगळी संकल्पना म्हणून मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांचे फोटो असलेले टी-शर्ट बनविण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा