You are currently viewing इन्सुली भाजपतर्फे गावात सी.ए पदवी घेतलेल्या कु.संकेत गावडे तसेच आर्ट बिट्स फाऊंडेशनकडुन पुरस्कार प्राप्त गजेंद्र कोठावळे, गजानन मेस्त्री यांचा सत्कार

इन्सुली भाजपतर्फे गावात सी.ए पदवी घेतलेल्या कु.संकेत गावडे तसेच आर्ट बिट्स फाऊंडेशनकडुन पुरस्कार प्राप्त गजेंद्र कोठावळे, गजानन मेस्त्री यांचा सत्कार

सावंतवाडी

इन्सुली भाजप पक्षाच्या वतीने गावात प्रथमच सी.ए परिक्षा देऊन उत्तीर्ण होऊन पदवी घेतलेल्या कु.संकेत सुरेश गावडे,अभिनय व कला क्षेत्रात आर्ट बिट्स फाऊंडेशन पुणे कडुन पुरस्कार प्राप्त गजेंद्र शाम कोठावळे तसेच आर्ट बिट्स फाऊंडेशनचा युवा कला गौरव पुरस्कार पकवाद वादक गजानन(सागर)सखाराम मेस्त्री या तिघांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच महाराष्ट्र संघातुन सिल्व्हरपदक पटकावल्याबद्दल कु.रिया महेंद्र पालव हिचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी सत्कार मुर्तींनी आपले मनोगत व्यक्त केले.भाजप पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी केलेला सत्कार आम्हाला प्रेरणा देईल आणि उत्साहाने आम्हाला आमच्या क्षेत्रात काम करण्याचे बळ मिळेल असे सांगितले.
यावेळी कोअर कमिटी अध्यक्ष श्री.अशोक सावंत,जिल्हा ओ.बी.सी सेल सचिव विकास केरकर,माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर,मंडल तालुका उपाध्यक्ष उमेश पेडणेकर,शक्ती केंद्र प्रमुख नितीन राऊळ,बुथ अध्यक्ष अजय सावंत,महादेव परब,सदानंद कोरगांवकर,अजय कोठावळे,ग्रां.पं.सदस्य स्वागत नाटेकर,महिला उपाध्यक्ष सौ.सुचिता शिंदे,सोसायटी संचालक हरिश्चंद्र तारी,साबाजी परब,आनंद राणे,ज्ञानेश्वर राणे,महेंद्र सावंत,प्रताप सावंत,सहदेव सावंत,प्रदिप सावंत,नितीन मुळीक,अभय आजगावकर,सौ.निकित धुरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा