You are currently viewing महिला काँग्रेस अध्यक्षांनी आनंदोत्सव केला साजरा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात

महिला काँग्रेस अध्यक्षांनी आनंदोत्सव केला साजरा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात

कुडाळ :

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही दिवसापूर्वी पार पडलेल्या नगरपंचायतींच्या निवडणुकीत जिल्ह्यातील चार नगरपंचायती मध्ये झालेल्या निवडणुका मध्ये नगराध्यक्ष निवड होणे बाकी होते. त्या चारही नगरपंचायतींमध्ये आज नगराध्यक्षपदासाठीच्या निवडी पार पडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे महाविकास आघाडी करून शिवसेना व राष्ट्रवादी यांनी एकत्रित निवडणुका लढविल्या होत्या. परंतु ऐनवेळी काँग्रेसने महाविकास आघाडीतून काढता पाय घेऊन स्वतंत्र निवडणूक लढविली. कुडाळ मध्ये भाजप हा पक्ष मागील पाच वर्षे स्वतंत्रपणे सत्तेत होता. परंतु नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला यावेळी आपली सत्ता राखता आली नाही. शिवसेनेच्या आमदार वैभव नाईक यांनी आपली ताकद पणाला लावून कुडाळ मधून राष्ट्रवादीला सोबत घेत सात जागांवर शिवसेनेला विजय मिळवून दिला. परंतु काँग्रेस पक्षाने वेगळी चूल थाटत निवडणूक लढविलेल्याने महाविकास आघाडीला पुरेसे मताधिक्य मिळाले नाही. शिवसेनेच्या सात जागा निवडून आल्या तर काँग्रेसने वेगळी चूल थाटत दोन जागा आपल्या पदरात पाडल्या आणि उर्वरित आठ जागांवर भाजपला विजय मिळाला. त्यामुळे आठ जागा मिळवत मोठा पक्ष असूनही भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही.

शिवसेनेने काँग्रेसला सोबत घेत कुडाळमध्ये महाविकास आघाडी ची सत्ता स्थापन केली. ही सत्ता स्थापन करण्याचे ठरविले त्यात काँग्रेसने पहिली अडीच वर्षे आपला नगराध्यक्ष बसणार अशी अट घातल्याने काँग्रेसच्या आफ्रीन करोल कुडाळच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या व शिवसेनेला उपनगराध्यक्ष पदावर समाधान मानावे लागले.

नगराध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत शहरातून मिरवणूक काढली. या मिरवणुकीत सामील झालेल्या काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ.साक्षी वंजारी आनंदाच्या भरात काँग्रेस कार्यालयात न जाता शिवसेनेच्या कार्यालयातच जात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या व नगरसेवकांच्या आनंदातच समाधान मानले व आनंदोत्सव साजरा केला. काँगेस कार्यालयात जिल्हा काँगेस अध्यक्ष बाळा गावडे व इतर सदस्य पोचले असता सौ.साक्षी वंजारी मात्र सेना कार्यालयातच आनंदोत्सव साजरा करत होत्या. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. सौ.साक्षी वंजारी यांच्या शिवसेना कार्यालयात जाऊन आनंदोत्सव साजरा करण्याच्या प्रकारावरून नक्की हा उत्सव काय सांगतो? असे अनेक जण एकमेकांमध्ये चर्चा करू लागले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 5 =