You are currently viewing 17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला ब्रेक

17 ऑगस्ट पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाला ब्रेक

टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय

मुंबई:

शालेय शिक्षण विभागाने 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याच्या काढलेल्या जीआरला सरकारने स्थगिती दिली आहे. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला असून शाळा सुरु होण्यासाठी शासनाच्या नव्या आदेशाची वाट पाहावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागानं दोन दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग कमी झालेल्या ग्रामीण भागातील पाचवी ते सातवी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्या संदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून काढण्यात आला होता. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत काही मंत्र्यांनी निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज व्यक्त केल्यानंतर हा निर्णय घेत शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − 3 =