You are currently viewing “कणकवली शहरातील तीन मजली इमारत रातोरात बेकायदेशीररीत्या पाडल्याप्रकरणी एसआयटी गठीत करा”

“कणकवली शहरातील तीन मजली इमारत रातोरात बेकायदेशीररीत्या पाडल्याप्रकरणी एसआयटी गठीत करा”

-संदेश पारकर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मागणी

कणकवलीतील तीन मजली इमारत बेकायदेशीरपणे पाडल्याबाबत शिवसेना नेते श्री.संदेश पारकर यांनी युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री.आदित्य ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेऊन एसआयटी गठीत करण्याची मागणी केली.

यावेळी श्री.आदित्य ठाकरे यांनी या सर्व प्रकाराची माहिती घेऊन कुणालाही पाठीशी न घालता दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन संदेश पारकर यांना दिले.

याबाबतचे निवेदन मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयामार्फत मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांना देखील दिले असल्याची महिती संदेश पारकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा