You are currently viewing श्रावणगीत

श्रावणगीत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्या लेखिका कवयित्री सौ.संजना जुवाटकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*श्रावणगीत*

आला हासत श्रावण
मनी नाचला श्रावण
आला फुलांना बहर
झाली सृष्टी ही पावन ll १ll

थेंब थेंब झंकारले
पानंपान शहारले
आनंदाच्या तरंगानी
तनमन मोहरले ll २ll

शालू हिरवा धरेचा
पाना, फुलांचीच नक्षी
गाणे चैतन्याचे गाती
सारे जीव, प्राणी, पक्षी ll ३ll

निळ्या आकाशी फुलतो
सात रंगांतला मेळ
मुले, माणसांत रंगे
ऊन, पावसाचा खेळ ll ४ll

सण येती मांगल्याचे
व्रते, पुजा, उपवास
लेकी , सुनांच्या मनाला
लागे माहेराची आस ll ५ll

असा साजिरा श्रावण
सखा माझा मनमीत
रूप त्याचे आळवित
गाते श्रावणाचे गीत ll ६ll

सौ.संजना विद्याधर जुवाटकर
कळवा, ठाणे.

प्रतिक्रिया व्यक्त करा