You are currently viewing सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम रहावे – मनीष दळवी*

सहकारी सोसायट्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम रहावे – मनीष दळवी*

सर्वसामान्यांना जगविण्याचे उद्दिष्ट, जिल्हा बँक गरजूंच्या सोबत कायम राहणार…

सावंतवाडी

फायनान्स कंपन्या चढ्या दराने कर्ज पुरवठा करुन नंतर ते कर्ज दांडगाईने वसुली करीत आहेत, अशा अनेक घटना घडत आहेत. त्यामुळे अशा शेतकर्‍यांच्या मागे सोसायट्यांनी रहावे त्यांना तात्काळ चाळीस हजारापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. यासाठी आवश्यक सहकार्य जिल्हा बँक करेल, असा विश्वास आज येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी आज येथे केले. दरम्यान भविष्यात शेतकर्‍यांना जगविण्यासाठी जिल्हा बँक एक पाऊल मागे घेण्याच्या तयारीत आहे. त्याचा फायदा घेवून जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी सक्षम होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. सावंतवाडी तालुक्यातील शंभर टक्के कर्ज परतफेड करणार्‍या सोसायट्यांचा आज जिल्हा बँकेच्या माध्यमातून सन्मान करण्यात आला. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बँकेचे संचालक महेश सारंग, विद्या परब, बाबल ठाकुर, पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद सावंत, बँकेचे अधिकारी अनिरुध्द देसाई, के. बी वरक, वसंत हडकर, उदय तावडे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.दळवी म्हणाले, या ठिकाणी सर्वसामान्य शेतकर्‍यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हा बँक काम करीत आहे त्या दृष्टीने आता सोसायट्या सक्षम केल्या जाणार आहे. शासन आणि सोसायट्या थेट जोडल्या गेल्यामुळे त्या कामात पारदर्शकता येणार आहे. आधुनिकतमुळे त्याचा फायदा ग्राहक, शेतकर्‍याला होणार आहे. त्यामुळे येणार्‍या काळात सोसायटयाच्या माध्यमातून गावागावात नक्कीच बदल घडतीलस असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री. परब यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा बँक आणि सोसायटीच्या माध्यमातून शेतकर्‍याला सक्षम बनविण्याच्या दृष्टीेन आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी संस्थेच्या सभासदासह अन्य अध्यक्ष उपाध्यक्षांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. दिलेली कर्ज मुदतीत परतफेड करुन घेतल्यास त्याचा फायदा ग्राहकां सोबत संस्थेला सुध्दा होणार आहे. त्या दृष्टीने नियोजन होणे गरजेचे आहे.
यावेळी तालुक्यातील ११ सोसायट्यांनी कर्ज परतफेड केल्याने त्याचा सन्मान करण्यात आला. यात कुणकेरी, कोलगाव, चौकुळ, देवसू आरोंदा, डेगवे आदी सोसायट्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विजय नाईक, रविंद्र परब, भालचंद्र कोरगावकर, धनश्री गवस, रघुनाथ वाळके, प्रमोद परब, मनोहक कोठावळे, संदिप सुकी, रघुनाध नाईक, अशोक धर्णे, ज्ञानदेव नाईक, अनंत नाईक, गजानन कोरगावकर, भिवनाथ गोसावी आदी संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा