You are currently viewing पाडलोसमध्ये गणेशोत्सवादरम्यान पोलिस गस्त वाढवा – तंटामुक्त समिती अध्यक्ष बंड्या माधव 

पाडलोसमध्ये गणेशोत्सवादरम्यान पोलिस गस्त वाढवा – तंटामुक्त समिती अध्यक्ष बंड्या माधव 

बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे वेधले लक्ष

बांदा

सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून देणे तसेच पितळीची भांडी चकाकणेसाठी निरनिराळी पावडर दाखवून नागरिकांची फसवणूक झाल्याच्या घटना पाडलोसमध्ये यापूर्वी घडल्या. सध्या गणेशोत्सव कालावधी असल्यामुळे आणि अशा भुरट्या चोरांवर पोलिसांचा वचक राहण्यासाठी दिवसातून निदान एक वेळा तरी पोलिस गस्त असावी जेणेकरून अशा गोष्टींना आळा बसेल, अशी मागणी पाडलोस तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रशांत ऊर्फ बंड्या माधव यांनी बांदा पोलिसांकडे केली.

बांदा पोलिस कर्मचारी रसिका माळकर, रंजना गावडे यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी पाडलोस सोसायटी व्हाइस चेअरमन विश्वनाथ नाईक उपस्थित होते. दरम्यान, सहायक पोलिस निरीक्षक श्यामराव काळे म्हणाले की, अशा चोरट्यांपासून पहिल्यांदा नागरिकांनी सावध असणे आवश्यक आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासन संपूर्णपणे सहकार्य करेल. तसेच भांड्यांना चकाकी आणणे, दागिने पॉलिश करून देतो असे सांगताना जर कोणी अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्यांनी गावातील पोलीस पाटील किंवा बांदा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन श्री. काळे यांनी केली. तसेच गस्त वाढविणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve − 10 =