You are currently viewing मालवण पं. स. निवडणूकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

मालवण पं. स. निवडणूकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

अनेक दिग्गजांना धक्का तर नवीन चेहऱ्यांना मिळणार संधी

मालवण

मालवण पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी आरक्षण सोडत आज तहसील कार्यालयात काढण्यात आली. या सोडतीत अनेक दिग्गजांना धक्के बसले आहेत. तर अनेक ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे.

तहसील कार्यालयात प्रांत वंदना खरमाळे आणि तहसीलदार अजय पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी कु. कौशल प्रतिक जाधव या मुलाच्या हातून चिठ्ठी काढण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, महेश मांजरेकर, अजिंक्य पाताडे, संतोष कोदे, अशोक बागवे, शशांक कुमठेकर, विजय केळुसकर, मोहन कुबल, विलास खिताफे आदी उपस्थित होते.

आरक्षण असे-

अनुसुचित जाती महिला आडवली-मालडी.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) शिरवंडे, मसुरे-मर्डे, नागरिकांचा मागास प्रवर्ग सुकळवाड.

सर्वसाधारण (महिला) – पेंडूर, चिंदर, कोळंब, वराड

सर्वसाधारण (खुला प्रवर्ग) – चौके, कुंभारमाठ, आचरा, पोईप गोळवण, वायरी- भूतनाथ

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + nine =