You are currently viewing आडाळी औद्योगिक वसाहती मधील भूखंड लवकरच खुले होतील…एकनाथ नाडकर्णींची माहीती

आडाळी औद्योगिक वसाहती मधील भूखंड लवकरच खुले होतील…एकनाथ नाडकर्णींची माहीती

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडून राजन तेलींना आश्वासन…

दोडामार्ग

तालुक्यातील आडाळी औद्योगिक वसाहती मधील भूखंड लवकरच खुले होतील, असे आश्वासन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.त्यामुळे गेले अनेक दिवस असलेली प्रतिक्षा आता संपणार, असा दावा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केला आहे. दरम्यान आडाळी एमआयडीसीतील भूखंड १५ ऑगस्ट पूर्वी उद्योजकाना देण्यास सुरवात करावी, अशी मागणी आडाळी औद्योगिक विकास कृती समिती व ‘ घुंगुरकाठी ‘ अंतर्गत स्थानिय लोकांधिकार समितीच्या वतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनद्वारे केली होती. यासंबंधीचे निवेदन एकनाथ नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी भाजपा नेते आशिष शेलार व श्री. तेली यांना दिले होते.
यावेळी तेली म्हणाले ‘ आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंड उद्योजकांना देण्याची कार्यवाही रखडली होती. स्थानिक ग्रामस्थांनी त्यासाठी पाठपुरावा केला. मात्र मागील सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. याठिकाणी उद्योजक येण्यासाठी इच्छुक आहेत. आता आपण स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बोललो. येथील भूखंड तातडीने खुले करण्यासाठी आदेश द्यावेत अशी मागणी केली आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे येथील भूखंड लवकरच खुले होतील. तसेच येथे उद्योग येण्यासाठी प्रयत्न केले जातील.

प्रतिक्रिया व्यक्त करा