You are currently viewing सिंधुदुर्गात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्गात शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

निष्ठेच्या प्रतिज्ञापत्रांचा गठ्ठा देऊन आ. वैभव नाईक यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिल्या शुभेच्छा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सिंधुदुर्ग जिल्हयात हजारोंच्या संख्येने शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली.शिवसेनेच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. निष्ठेची प्रतिज्ञापत्रे देखील शिवसेना पदाधिकारी दाखल करत आहेत.दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रांचा गठ्ठा कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या अनोख्या शुभेच्छांनी उद्धव ठाकरे देखील भारावून गेले. यावेळी खासदार अरविंद सावंत, रवींद्र वायकर, अभिनेते आदेश बांदेकर, शिवसेना नेते संदेश पारकर आदी उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सदस्य नोंदणी व प्रतिज्ञापत्रांबाबत दिलेल्या आदेशानुसार सिंधुदुर्गात सदस्य नोंदणीची मोहिम सुरु करण्यात आली आहे. सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शिवसेनेवर आलेल्या राजकीय संकटाला सामोरे जाण्यासाठी तळागाळातील शिवसैनिक सरसावले आहेत. युवकांबरोबर, पुरुष, महिला, वृद्ध देखील सदस्य नोंदणी करत आहेत. मालवण कांदळगाव येथील विलास भोगले यांना अपंगत्व आले असताना देखील त्यांनी पक्षनिष्ठा दाखवत शिवसेना शाखेत भेट देऊन सदस्य नोंदणी करून घेतली. आजच्या दिवसात हजारो लोकांनी शिवसेना सदस्य नोंदणी केली आहे. यासाठी अनेक शिवसेना पदाधिकारी देखील मेहनत घेत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा