You are currently viewing तरेळे हायस्कूल मध्ये रानभाजी महोत्सव २०२२ संपन्न.

तरेळे हायस्कूल मध्ये रानभाजी महोत्सव २०२२ संपन्न.

वामनराव महाडीक विद्यालयातील पाककला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद
विद्यालयातील ८२ विद्यार्थ्यांचा सहभाग

पाककला स्पर्धेत गटवार प्रेरणा तळेकर , प्रियल अमृते , कशिश पानवाला प्रथम

वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे प्रशालेच्या डॉ.एम.डी.देसाई हॉलमध्ये रानभाजी महोत्सव २०२२ अतिशय उत्साह पूर्ण वातावरणात पार पडला. दोन टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये पहिला टप्पा हा रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन, परीक्षण व प्रदर्शन तर दुसऱ्या टप्प्यात बक्षीस वितरण समारंभ पार पडला . कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व प्रशालेचे संस्थापक कै.वामनराव महाडीक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

प्रियल अमृते हिला पारितोषिक प्रदान करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रविण वरूणकर ,बाजूला शरद वायगणकर , प्राचार्य अविनाश मांजरेकर , सी.व्ही.काटे, पी.एन. काणेकर , डी.सी.तळेकर , आदी शिक्षकवृंद 

‘चव कोकणची आपल्या रानभाज्यांची’ या टॕग लाईनचा वापर करत घेण्यात आलेल्या रानभाजी महोत्सव २०२२ च्या पाककला स्पर्धेत एकापेक्षा एक पदार्थ विद्यार्थ्यांनी सादर केले यामध्ये पहिल्या पाचवी ते सातवी गटातून प्रेरणा मिनेश तळेकर हिने प्रथम क्रमांक पटकावला. अर्जुन रामप्रसाद राणे द्वितीय , मितेश गोपाळ चव्हाण तृतीय शुभांगी विजय घाडी , निष्ठा नितीन पांचाळ यांनी उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त केले

.

पहिल्या गटातून प्रथम आलेल्या प्रेरणा तळेकर  हिला पारितोषिक प्रदान करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रविण वरूणकर ,बाजूला शरद वायगणकर , प्राचार्य अविनाश मांजरेकर , सी.व्ही.काटे, पी.एन. काणेकर , डी.सी.तळेकर , आदी शिक्षकवृंद 

दुसऱ्या आठवी ते दहावी गटातून प्रियल प्रवीण अमृते हिने आणलेल्या टाकळ्याच्या टीक्कीने प्रथम , आयुष सदानंद सुतार द्वितीय , लावण्य अजित जोईल तृतीय तर उत्तेजनार्थ म्हणून मयुरी संतोष तळेकर ,रितिका विलास चव्हाण यांना गौरवण्यात आले . तर तिसऱ्या ११वी , १२ वी कला व वाणिज्य गटातून कशिश प्रणव पानवा हिने आणलेल्या कुरडू मोमोज या पदार्थाने प्रथम क्रमांक प्राप्त केला तसेच द्वितीय स्नेहल संतोष तळेकर , तन्वी महेंद्र कदम तृतीय तर उत्तेजनार्थ पारितोषिक सानिका सुभाष साटम दीक्षा मनोज तळेकर हिने पटकावले . प्रत्येक गटातून प्रथम , द्वितीय , तृतीय विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र पुष्पगुच्छ तर उत्तेजनार्थ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांनाही यावेळी सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली.

पाककला स्पर्धेचे परिक्षण करताना  शशांक तळेकर , रविंद्र पाष्टे, श्रावणी मदभावे , निकेत पावसकर , स्नेहल घाडीगावकर 

यावेळी शाळा समिती सदस्य व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रविण वरूणकर , शरद वायंगणकर , निलेश सोरप , प्राचार्य अविनाश मांजरेकर , संतोष तळेकर , सी. व्ही काटे , चंद्रकांत तळेकर , नंदकिशोर ठाकूर , उदय तळेकर , गणेश घाडी , रामप्रसाद राणे , प्राध्यापिका ए. बी. कानकेकर , डी. सी. तळेकर , पी.एन. काणेकर , एन.बी. तडवी , व्ही.डी. टाकळे, एन. पी. गावठे , ए.पी. कोकरे , ए.बी. तांबे, एस.यु. सुर्वे , एस.एन.जाधव कनिष्ठ लिपीक कल्पेश तळेकर , प्रकाश घाडी , देवेंद्र तळेकर , संदेश तळेकर आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक , ग्रामस्थ , विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

पी.एन् काणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेफ टोप्या बनवताना विद्यार्थी 

रानभाजी महोत्सव २०२२ पाककला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी मांडलेले पदार्थ आणि रानभाजीबद्दल चे विद्यार्थ्यांचे ज्ञान पाहून परीक्षकही भारावून गेले. जि.प.प्राथमिक शाळा साळीस्ते चे रविंद्र पाष्टे , अक्षरोत्सव चे प्रमुख तसेच दै.लोकमत चे पत्रकार निकेत पावसकर, श्रावणी कम्प्युटर्स, तळेरे च्या श्रावणी मतभावे,माजी सरपंच शशांक तळेकर,श्रुती हॉटेल च्या मालक स्नेहल घाडीगावकर,प्रशालेच्या शिक्षिका प्रतिभा पाटील यांनी स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून काम केले . .रानभाज्यांविषयी किंवा केलेल्या पदार्थांविषयी विविध प्रश्न विचारत विद्यार्थ्यांच्या चौकस बुद्धीला चालना देण्याचे काम परीक्षकांनी केले व विद्यार्थ्यांनीही आपण केलेल्या पदार्थाविषयी माहिती सांगत त्यांच्याशी छान संवाद साधला. रानभाज्यांची चव , परीक्षकांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांची असलेली ओळख- माहिती, प्रत्येक पदार्थांतील नाविन्यता , सजावट यामुळे परीक्षण करताना मोठा कस लागल्याचे बोलून दाखविले

रानभाज्यांचे महत्त्व त्यांची नैसर्गिक उपलब्धता आपल्या आरोग्यास कशी चांगली आहे, याचे मार्गदर्शन शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर यांनी केले.आपल्या मातीशी आपली नाळ जोडलेली असणं ही आपल्या स्वास्थ्यासाठी नव्हे तर आपल्या अस्तित्वासाठी कसे महत्त्वाची आहे याबद्दल प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी आपल्या मनोगतातुन सांगितले. जेष्ठ शिक्षक सी.व्ही. काटे , परीक्षक प्रतिभा पाटील , बारावी वाणिज्य शाखेची विद्यार्थीनी स्नेहल तळेकर यांनी सुद्धा यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
विद्यालयाचे शिक्षक पी.एन काणेकर यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शखाली या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन , मांडणी करण्यात आली. यासाठी प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभल्याचे ते म्हणाले . विद्यार्थ्यांना कार्यानुभव अंतर्गत कागदी टोप्या बनवण्याचा उपक्रमही याअनुषंगाने राबण्यात आला .

रानभाजी स्टाॕलवर भाजी खरेदी करताना पालक 

रानभाजी महोत्सवास मान्यवर , पालक , ग्रामस्थ विद्यार्थी यांनी भेट देत पदार्थांचा आस्वाद घेतला . तसेच इयत्ता सातवी व दहावी च्या श्रावणी पांचाळ, तन्वी तळेकर , राज मांजरेकर , यश खरात , झगडे या विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधित्वात उभारलेल्या रानभाजी स्टाॕलवर आपली ताजी रानभाजी खरेदी करण्यासाठी उपस्थितांनीं मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांना भाज्यांची ओळख व्हावी , व्यवहारीक ज्ञान वाढवे, व्यवसायिक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने हे स्टाॕल मांडण्यात आले होते. यावेळी टाकळा, कुरडू, भांरंगी , काटली, भाजीचे अळू , अळूवडीचे अळू , एक पान भाजी , पेवगा, शेवगा , चवईचे बोंड , बांबूचे कोंब , बिरमुळे , अशा विविध भाज्या यावेळी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. याला सर्वांचाच उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .


कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.सी.तळेकर , सूत्रसंचालन प्राध्यापिका ए.बी. कानकेकर यांनी तर आभार एस.यु. सुर्वे यांनी मानले.

सहभागी विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी 

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + ten =