You are currently viewing सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर सेनेची पकड..

सागरतीर्थ ग्रामपंचायतीवर सेनेची पकड..

वेंगुर्ला
तालुक्यातील सागरतीर्थ ग्रा प वर शिवसेनेने बाजी मारली यात ३ प्रभागामध्ये शिवसेनेचे ५ सदस्य विजयी झाले तर काँग्रेस २ व अपक्ष २ विजयी झाले. प्रभाग १ मध्ये काँग्रेस चे माजी ग्रा प सदस्य राजू मोडकर यांचा ७ मतांनी पराभव झाला. शिवसेनेचे ज्ञानदेव चोपडेकर विजयी झाले. प्रभाग १ मध्ये प्रणय कमलाकर बागकर (अपक्ष) स्मिता बेनित फर्नांडिस (शिवसेना),मेरी फ्रान्सिस फर्नांडिस (शिवसेना) विजयी झाल्या तर प्रभाग २ मध्ये ज्ञानदेव श्रीधर चोपडेकर(शिवसेना) पांडुरंग सुरेश फोडनाईक(काँग्रेस) सुषमा राधाकृष्ण गोडकर(काँग्रेस) विजयी झाल्या.

प्रभाग ३ मध्ये एकनाथ यशवंत कुडव(शिवसेना)गायत्री स्वप्नील गोडकर(अपक्ष) तर या अगोदरच समृध्दी संतोष कुडव या सेनेच्या बिनविरोध निवडून आल्या असून सेनेची मजबूत झाली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × four =