You are currently viewing श्री संत नामदेव पुण्यतिथी निमित्त सर्वांना वंदन!

श्री संत नामदेव पुण्यतिथी निमित्त सर्वांना वंदन!

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी गीतकार संगीतकार गायक अरुण गांगल यांची अप्रतिम काव्यरचना

नामदेव करी किर्तन नाचे पांडुरंग
भक्तांसाठी अलौकीक असे गोड सत्संग।।ध्रु।।

भारत-भ्रमण करती नामाचा प्रसार
टाळ चिपळ्यांचा चाले अखंडच गजर
विठूचे गुणगान करती गाती अभंग।।1।।

घराणे श्रीमंतच परी विनम्र अपार
कुटुंबातील सर्व करती नाम गजर
सर्व एका वेळी घेती समाधी,होती नि:संग।।2।।

नामदेव सांगती जनाईची पदे अविट
शिष्या ठायी प्रेम आदर करिती प्रगट
जो गाईल पदे अंगणी नाचे पांडुरंग।।3।।

नाम तेची रुप रुप तेची नाम एकच
नाम केशव केवळ जाणे भाव भक्तच
नामा प्रार्थी देवा दिनांस दावा प्रेम रंग।।4।।

काव्य: श्री अरुण गांगल.कर्जत रायगड महाराष्ट्र.
पिन. 410201.
Cell.9373811677.

प्रतिक्रिया व्यक्त करा