You are currently viewing धुंद पावसाळा

धुंद पावसाळा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखिका कवयित्री भावना गंगमवार लिखित अप्रतिम युगल गीत

 

पुरूष= थांब थांब सखे करू नको घाई
स्री = नको नको सख्या वाट बघते आई ||धृ||

पुरूष= बघ जरा सुटलाय गार गार वारा
स्री =रोमांचित मन अंगावर शहारा
पुरूष =पावसाचा आनंद नको छत्री डोई
स्री = नको नको सख्या वाट बघते आई

पुरूष = बस जरा खेटून कां तू दूरदूर
स्री= आरक्त गाली लाजेने मी चूरचूर
पुरूष = बेधुंद पावसात धरा चिंब होई
स्री = नको नको सख्या वाट बघते आई

पुरूष = बस जरा न्याहाळू दे ओलेती रूप
स्री = खट्याळपणा पुरे बस गुपचूप
पुरूष = नको जाऊ दूरदूर तू ग सई
स्री = नको नको सख्या वाट बघते आई

पुरूष = चल जरा जाऊ धूंद होऊ पावसात
स्री = नको नको सख्या धडधडते ह्रदयात
पुरूष = श्वासात श्वास जरा उबदार होई
स्री = नको नको सख्या वाट बघते आई

पुरूष = चल बघू कुठेतरी जरा आडोसा
स्री= धरशील का रे तू धीर थोडासा
पुरूष = आला क्षण बघ सखे दूरदूर जाई
स्री = नको नको सख्या वाट बघते आई

पुरूष = तुझ्या ओल्या बटांशी वारा कां खेळतो
स्री = अरे ,सख्या तुलाच असा चिडवितो
पुरूष =चल बघू पावसात गंधाळलेली जाई
स्री = नको नको सख्या वाट बघते आई

सौ.भावना स.गंगमवार ,वणी
जि.— यवतमाळ

प्रतिक्रिया व्यक्त करा