You are currently viewing मला पिरतीच्या ….

मला पिरतीच्या ….

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा. सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना

कुणी हुशार कारागिर बोलवा …
मला पिरतीच्या झुल्यावर झुलवा…

साग सिसम घडवेल झोका
मी बसताच चुकेल ठोका
वाऱ्यावरती उडेल पदर
भिरभिरेल तुमची नजर
झुल्यावरती घास मला भरवा ….
मला पिरतीच्या ……

झुल्यावरती दोघं जोडीनं
झुलू दोघेही लाडीगोडीनं
हात हातात घेऊ प्रेमानं
गाऊ पिरतीचं एखादं गाणं
तुम्ही दमात शिटी मग वाजवा….
मला पिरतीच्या……

राया तुम्हावर लई माझा जीव
बघा पिरतीचं उभारू गावं
गोड पिरतीला येईल फूलं
जगी पिरतीचं लई आहे मोल
माझ्यावरती हक्क तुम्ही गाजवा….
मला पिरतीच्या……

तुम्ही राजस खानदानी राजं
माझ्या पिरतीचं तुम्हावरं व्याज
तुम्हा पाहता लाजेनं लाल
माझे गुलाबी होतात गालं
मला गुलाब मोगऱ्यानं सजवा …
मला पिरतीच्या झुल्यात झुलवा ..

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि: २५ जुलै २०२२
वेळ : रात्री. १० : ४५

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − sixteen =