You are currently viewing आरती बायकोची

आरती बायकोची

जागतिक मराठी साहित्य कला व्यक्ती विकास मंच सदस्य राष्ट्रीय प्रतिभा पुरस्कारित ज्येष्ठ लेखक,कवी प्रा.डॉ.जी.आर.उर्फ प्रवीण जोशी यांची रचना*

आरती बायकोची

जयदेवी जयदेवी जय अर्धांगिनी
किती वर्णू मी आता  गोड ती वाणी जयदेवी जयदेवी ।। धृ ।।

येता जाता तुम्ही अहो अहो
करता
मधाचे बोट नेहमी दाखवता
मनामधले तुमच्या काही न कळता
तुम्हीच तर आहात राजाची राणी
कसे वर्णू मी तुमची गोड ती वाणी जयदेवी जयदेवी ।।1।।

लटकेच हसता लटकेच रुसता
सासुच्या नावाने शिमगा च करता
लाडी गोडी ने खिसा कापता
रोजचीच तुमची ऐकतो गाणी             ।। 2 ।।

माहेरच घराणे तुमचे हो छान
माहेरचं वागणे आहे हो महान
अंगात नसता कसलाही त्राण
ऐकवता माहेरची सुंदर कहाणी
कशी वर्णू तुमची गोड ती वाणी जयदेवी जयदेवी

अस का करता तस का करता
येता जाता आम्हाला तुम्ही टोकता
गोठयातला  टोणगा असे समजता
तुमच्या पेक्ष्या चांगली आमची मेव्हणी

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
©अंकली बेळगांव

प्रतिक्रिया व्यक्त करा