You are currently viewing श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय एकोणीस

श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय एकोणीस

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा.सदस्या ज्येष्ठ कवयित्री सौ मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम अष्टाक्षरी रचना*

*श्री गजानन विजय ग्रंथ*
अध्याय एकोणीस

संजीवन समाधीचा
रंगे सुरेख सोहळा
एकोणीस अध्यायात
एक वेगळा आगळा ||

हरी पाटलासह श्री
गेले होते पंढरीला
आता जाया आज्ञा द्यावी
प्रार्थी विठूमाऊलीला ||

अवतार कार्य संपे
इच्छा वैकुंठास यावे
भाद्रपदमासी येत्या
दान इतुकेची द्यावे ||

भाद्रपद पंचमीला
बोळवावे या देहाला
देह वस्त्र बदलावे
कृष्ण गीतेत वदला ||

प्राण रोधला हो” श्रींनी
केला मस्तकी धारण
गुरूवारी प्रहराला
उच्चारव गजानन ||

शोक लोकांना अपार
गमावला ‌‌सौख्यठेवा
ज्ञानदिप मालवला
गेला आमुचा विसावा ||

मूर्ती लोपणार नक्की
येऊ द्या भक्त दर्शना
स्वप्नी समर्थ सांगती
दूर प्रांतीच्या भक्तांना ||

पथी गोमयाचे सडे
स्त्रिया रांगोळ्या रेखिती
रथ तो सज्ज जाहला
बसविण्या श्रींची मूर्ती ||

बुक्का तुळशी गुलाल
पैसे रथी उधळती
दिंड्या भजन गजर
खिरापती ही वाटती ||

रात्रभर शेगांवास
चाले सोहळा भक्तीचा
उगवता दिनमणी
सोपस्कार समाधीचा ||

मूर्ती उत्तराभिमुख
अभिषेक पूजा केली
मीठ अबीर अर्गजा
“गार” असे हो भरली ||

अलौकिक संत ज्योत
चराचरी तिचा वास
येई आजही प्रचिती
त्यांच्या निस्सीम भक्तास||

©️®️
सौ.मंजिरि अनसिंगकर
नागपूर.

संवाद मीडिया*

*📢 बुकिंग सुरु….बुकिंग सुरु…बुकिंग सुरु..*📣

*🔹गणेश बाग रेसिडेन्सी*🔹

*⚜️व्हि.एस.पी. रिअलटर्स अँड इंफ्रास्ट्रक्चर्स*⚜️

*कलेक्टर मंजूर…👇*
https://sanwadmedia.com/129656/

*🏬निवासी बंगलो प्लॉट व रेडी बंगलो लेआऊट*🏡🏘️🏘️

*🏠 3 BHK बंगलो उपलब्ध*🏡

*▪️पथ दिवे ▪️ मुबलक पाणी ▪️ प्रशस्त अंतर्गत रस्ते▪️ प्लॅट च्या किंमती मध्ये स्वतंत्र बंगला▪️ प्रत्येक चाकरमन्याच्या मनातील गावाकडील घर*

*बुकिंग संपर्क :*👇
*📲 7038800789*
*📲 8983092326*

*देवरुख एस. टी. स्टॅंड पासून फक्त १.० कि. मी. अंतरात*

*साईट : मु. पो. गणेश बाग, ओझरे खुर्द,*
*देवरूख, संगमेश्वर, रत्नागिरी*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/129656/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा