You are currently viewing कैदेत गुलाबांच्या !!

कैदेत गुलाबांच्या !!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी बाबा ठाकूर लिखीत अप्रतिम काव्यरचना*

*कैदेत गुलाबांच्या !!*

कैदेत या गुलाबांच्या
अजून किती काळ राहू
जखमा झाल्या इतक्या
आता सुगंधी तरी कसा राहू…!

हा छंद नव्हे
हे तर जगणे माझे
नसे कुणी सोबतीला
संगी गुलाब असती माझे

आकाश जमीनीला
स्पर्श करत जगलो
तुझे सौंदर्य जपत
सुस्वरूप होवून जगलो

गुलाबांनो तुमच्या सोबतच
असावी ओळख माझी
जगण्याच वय माहित नाही पण
निघतांना!अंगावर साथ तुमची असावी

वर गेल्यावर
आईला तुम्हांला सोपविन
वाट पाहत असेल ती
ॠण तुमचे!चुकते करीन..!!

बाबा ठाकूर धन्यवाद

प्रतिक्रिया व्यक्त करा