You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक कार्यरत असल्याने सिंधुदुर्गात शिवसेना जोमाने वाढेल – पुष्कराज कोले

आ. वैभव नाईक यांच्यासारखे निष्ठावंत शिवसैनिक कार्यरत असल्याने सिंधुदुर्गात शिवसेना जोमाने वाढेल – पुष्कराज कोले

..तेव्हा हेच बंडखोर आमदार भाजपचा द्वेष करत होते- आ. वैभव नाईक

तेंडोली व झाराप जिल्हापरिषद मतदारसंघाची विभागीय बैठक संपन्न

बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक कट्टर शिवसैनिक तयार झालेत. बाळासाहेब, उद्धवसाहेब यांच्यामुळे अनेक सामान्य शिवसैनिकांना मोठं मोठी पदे प्राप्त झाली.मात्र त्यातील काहीजणांनी आता शिवसेनेशी गद्दारी केली आहे. ज्या शिवसेनेने त्यांना सर्वकाही दिले त्याच शिवसेनेवर आता हे लोक खोटे नाटे आरोप करत आहेत.दीपक केसरकर, उदय सामंत यांनी शिवसेनेची मंत्री पदे उपभोगून देखील गद्दारी केली. आपले आमदार वैभव नाईक मात्र कोणत्याही अमिषाला बळी न पडता शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले त्याचा आपल्याला अभिमान आहे. आ. वैभव नाईक यांच्यासारखे निष्ठावंत अनेक शिवसैनिक सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यरत असल्याने जिल्ह्यात शिवसेना आणखी जोमाने वाढणार आहे. शिवसेना कोणीही संपवू शकत नाही. असा विश्वास उद्योजक पुष्कराज कोल्हे यांनी व्यक्त केला
कुडाळ तालुक्यातील तेंडोली व झाराप जिल्हापरिषद मतदारसंघाची विभागीय बैठक शुक्रवारी सायंकाळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व उद्योजक पुष्कराज कोले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांना त्यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान कुडाळ तालुक्याच्या वतीने शिवसेनेशी व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठतेची प्रतिज्ञापत्रे देण्याचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी आमदार वैभव नाईक म्हणाले, ज्यावेळी आपण निवडणुकीला उभे राहिलो तेव्हा मोजकेच कार्यकर्ते होते. याच सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी माझ्याकडून एक रुपयाही न घेता त्यांनी स्वतः मेहनत घेतल्याने व जनतेच्या आशीर्वादामुळे मी दोन वेळा आमदार झालो. हे मी कधीच विसरणार नाही. या शिवसैनिकांशी मी प्रामाणिक राहून सर्वसामान्य लोकांसाठी काम करत राहणार आहे.गेलेले आमदार खासदार वेगवेगळ्या आमिषांना बळी पडून गेले आहेत. हेच लोक जेव्हा शिवसेना भाजपची युती होती तेव्हा देखील निधी मिळत नाही म्हणून उद्धवजी ठाकरे यांच्याकडे तक्रारी करत होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक शिवसेना आमदारांच्या विरोधात भाजपने आपले बंडखोर उमेदवार उतरवले होते. तेव्हा देखील हे बंडखोर आमदार भाजपचा द्वेष करत होते.त्यामुळे या लोकांच्या वक्तव्यांना जास्त महत्व देण्याची आवश्यकता नाही. मी मंजूर करून घेतलेल्या काही कामांना सध्याच्या सरकारने स्थगिती दिली आहे. मात्र स्थगिती उठविण्यासाठी मी प्रयत्न करून कामे पूर्णत्वास नेणार आहे. असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.


यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, माजी उपसभापती जयभारत पालव, अतुल बंगे,उपतालुकाप्रमुख बाळू पालव, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, तेंडोली विभाग प्रमुख संदेश प्रभू, झाराप विभागप्रमुख गंगाराम सडवेलकर, रुपेश पावसकर, हुममळा (वालावल) सरपंच सौ.अर्चना बंगे, कवटी सरपंच रुपेश वाडयेकर,पिंगुळी सरपंच निर्मला पालकर, आंदुर्ले सरपंच पूजा सर्वेकर, राजू गवंडे, महेश वेळकर,दिनेश गोरे, मितेश वालावलकर, अमृत देसाई, अशपाक कुडाळकर, अनिकेत तेंडुलकर, मंगेश बांदेकर, बबलू पिंगुळकर, भरत परब, राजेंद्र सडवेलकर, सुनील हळदणकर, सायली सर्वेकर, मंगेश बांदेकर,आदींसह तेंडोली व झाराप जिल्हापरिषद मतदासंघातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 13 =