You are currently viewing काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सच्चिदानंद बुगडे हेही शिवबंधनात

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते सच्चिदानंद बुगडे हेही शिवबंधनात

सावंतवाडी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे सचिव सच्चिदानंद मधुकर बुगडे यांनीही आपल्या पदासह काँग्रेस सदस्य पदाचाही राजीनामा दिला. चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्यासोबत आज बुगडे हेही मातोश्रीवर शिवबंधन बांधणार आहेत. सच्चिदानंद बुगडे हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. कै.भाईसाहेब सावंत यांचे निकटवर्तीय कै. मधुकर बुगडे यांचे सच्चिदानंद बुगडे हे चिरंजीव, एन एस यु आय जय महाराष्ट्र प्रदेश सचिव, रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
सावंतवाडी तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत होते.
बुगडे यांनीही राजीनामा दिल्याने काँग्रेसचे निष्ठावंतही बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखाली शिवबंधन बांधण्याच्या तयारीत असल्याचे कळते.

प्रतिक्रिया व्यक्त करा