You are currently viewing ग्रामस्थांना दिलेला शब्द आमदार वैभव नाईक यांनी पूर्ण केला…!

ग्रामस्थांना दिलेला शब्द आमदार वैभव नाईक यांनी पूर्ण केला…!

ओझर-कांदळगाव-मसुरे-आडवली रस्ता विशेष दुरुस्तीच्या (२ कोटी ५० लाख) निविदेस मंजुरी

सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय

पूर्णपणे खड्डेमय बनलेल्या व वाहतुकीस धोकादायक ठरणाऱ्या कांदळगाव-मसुरे मुख्य रस्त्याच्या विशेष दुरुस्तीसाठी २ कोटी ५० लाख रकमेच्या निविदेस महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिली आहे.

दरम्यान, या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी कांदळगाव ग्रामस्थांनी १२ फेब्रुवारीला रास्तारोको आंदोलन केले होते. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी ग्रामस्थांना आश्वासीत करताना सांगितले, या रस्त्यांचा पाठपुरावा मंत्रालय स्तरावर करत आहे. आठ दिवसात रस्ता मंजूर करून घेतला जाईल. तर महिनाभराच्या आत रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होईल.

ग्रामस्थांना दिलेला शब्द आमदार वैभव नाईक यांनी पूर्ण करताना आठ दिवसाच्या आत रस्ता काम मंजूर करून घेतले आहे.

अल्प कालावधीची निविदा प्रक्रिया असल्याने लवकर तांत्रिक बाबी पूर्ण करून लवकरात लवकर प्रशासनाकडून काम सुरू करण्याची कार्यवाही करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, रस्त्याच्या विशेष दुरुस्तीस मंजुरी देत निधी मंजूर केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आमदार वैभव नाईक यांनी आभार मानले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

11 − two =