You are currently viewing युवक राष्ट्रवादीतर्फे उद्या अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

युवक राष्ट्रवादीतर्फे उद्या अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

कुडाळ :

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवारी दि.२२रोजी सिंधुदुर्ग जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी दिली.

या कार्यक्रमांचे प्रामुख्याने रक्तदान शिबिर, वारकरी संप्रदाय यातील ज्येष्ठांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करणे, विशेष करून महिलांकरिता शेतामध्ये भात लावणीची स्पर्धा, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच गणवेश वाटप करण्यात येणार आहे. शेतकरी वर्गासाठी कल्पवृक्ष झाडांचे वाटप करण्यात येणार आहे. हे सर्व कार्यक्रम कणकवली तालुक्यातील विशेष करून कळसुली जिल्हा परिषद मतदारसंघात, त्याचप्रमाणे वैभववाडी तालुक्यातील काही गावांमध्ये, सावंतवाडी आणि कुडाळ तालुक्यातील काही गावांमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहे .या कार्यक्रमास युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा युवकचे अध्यक्ष सुद्रिक यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा